मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होवोत ! होमहवन, अभिषेक सुरु

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

शेकडाे शिवसैनिकांनी ठिकठिकाणी पूजा अर्चा, हाेमहवन तसेच अभिषेक असे धार्मिक उपक्रम राबविण्यास प्रारंभ केला आहे. 

कराड : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा पूर्णत्वाकडे जात असल्याने तसेच शिवसेनेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होवोत यासाठी कराड येथील शिवसैनिकांनी कृष्णा घाटावरील श्री. रत्नेश्वर मंदिरात होमहवन व अभिषेक केला. यावेळी शेकडाे शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी प्रमोद वेर्णेकर, कुलदीप जाधव, महेश कोळी, दशरथ धोत्रे, राजेंद्र माने, ज्ञानदेव भोसले, संभाजी जगताप,विशाल देशपांडे यांच्यासह शेकडाे शिवसैनिक उपस्थित होते.

श्री. रत्नेश्र्वर मंदिरातील श्री. शंभू महादेवाच्या पिंडीवर अभिषेक वाहण्यात येत आहे त्यानंतर मंदिरात होम-हवन हवन केला जाणार आहे. विद्यावाचस्पती विनायक गरुड यांनी होमहवन तर अतुल कुलकर्णी व मिलिंद कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pooja, Abhishek Started For Chief Minister Uddhav Thackeray