वादग्रस्त श्रीपाद छिंदमचा भाऊही नव्या वादात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा नगरचा वादग्रस्त माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या भावाने आणखीन एक नवा वाद निर्माण केला आहे. श्रीपाद छिंदम याचा भाऊ श्रीकांत छिंदम याने चक्क ‘ईव्हीएम’ मशीनची पूजा केल्याचा प्रकार समोर आला आहे.

नगर- छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा नगरचा वादग्रस्त माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या भावाने आणखीन एक नवा वाद निर्माण केला आहे. श्रीपाद छिंदम याचा भाऊ श्रीकांत छिंदम याने चक्क ‘ईव्हीएम’ मशीनची पूजा केल्याचा प्रकार समोर आला आहे.

नगर महापालिका निवडणुकीसाठी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. नगरमध्ये मतदानासाठी एकूण 367 मतदान केंद्र आहेत. मात्र मतदान केंद्रामध्ये एक पुजारी व श्रीकांत छिंदम हे मशीनची पूजा करत असतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

महापालिका निवडणुकीसाठी श्रीपाद छिंदम हा प्रभाग क्रमांक 9 मधून अपक्ष निवडणूक लढवत आहे. तर त्याची पत्नी प्रभाग क्रमांक 13 मधूम उभी आहे. छिंदमच्या विजयासाठी त्याचा भाऊ श्रीकांत छिंदमने तोफखाना परिसरातील मतदान केंद्रावर ब्राम्हणाच्या हस्ते पूजा-अर्चा केली. मतदान केंद्रावर पूजा केल्याचे समजताच नागरिकांमध्ये आणि इतर उमेदवारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Pooja of the EVM machine by Chindan brother