सोलापुरातील तिघांचे नगरसेवकपद रद्द होण्याची शक्‍यता 

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

सोलापूर : जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्याने कॉंग्रेसच्या अनुराधा काटकर, एमआयएमच्या शाहजीदाबानो शेख आणि भाजपचे सुभाष शेजवाल यांचे नगरसेवकपद रद्द होण्याची शक्‍यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील सर्व याचिका फेटाळल्या. 

सौ. काटकर आणि सौ. शेख यांनी दिलेल्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र दिले नसल्याने, तर शेजवाल यांनी अद्यापही प्रमाणपत्रच सादर केले नसल्याचा अहवाल महापालिकेतील निवडणूक कार्यालयाने शासनाकडे पाठविला होता.

सोलापूरसह राज्यातील जवळपास नऊ हजार लोकप्रतिनिधींना या निर्णयाचा फटका बसणार आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची 23 ऑगस्ट 2017 पर्यंत मुदत होती. मात्र, कॉंग्रेसच्या अनुराधा काटकर आणि एमआयएमच्या शहाजीदाबानो शेख यांनी मुदतीत प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांच्या सदस्यत्वाबाबत काय करावे, अशी विचारणा महापालिकेने त्याच दिवशी शासनाकडे केली होती. योगायोगाने बरोबर एक वर्षाने सर्वोच्च न्यायालयाने या दोन्ही नगरसेविकांनी दाखल केलेली याचिका रद्दबातल केली  आहे. 

प्रतीक्षा न्यायालय आदेशाच्या प्रतीची 
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर, त्यानुसार आदेश काढले जातील. त्यामुळे न्यायालय आदेशाची प्रतीक्षा निवडणूक कार्यालयाला असणार आहे.

Web Title: The possibility of the cancellation of three municipal corporations in Solapur