डाक कर्मचाऱ्यांचे आंदोलन अकराव्या दिवशीही सुरूच 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

नगर : ग्रामीण डाक सेवकांना खात्यात समाऊन घेवून सातवा वेतन आयोग व कमलेशचंद्र समितीच्या शिफारशी लागू कराव्यात या मागणीसाठी अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेने सुरू केलेले आंदोलन अकराव्या दिवशीही सुरूच आहे. 

केंद्र सरकार व डाक विभागाला मृत घोषित करून त्यांच्या प्रतिकात्मक प्रेतासमोर टाहो फोडून बोंबा मारण्याचे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष आनंद पवार, सचिव एन. बी. जहागीरदार, कार्याध्यक्ष जी. टी. राजगुरु, अशोक बंडगर, लक्ष्मण बर्डे, विजयकुमार एरंडे, श्रीमंदिलकर टेके, सलिम शेख आदी सहभागी झाले. संपाकडे सरकार व डाक विभाग लक्ष देत नसल्याने त्यांना मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. तसेच मृतांचा दहावा व तेरावा करण्यात आला. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. ग्रामीण डाक सेवकांना ही तरतूद केली नसल्याने ग्रामीण डाक सेवकांनी 22 मे पासून देशव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत संप चालू राहील,असा इशारा संघटनेने दिला आहे.

Web Title: post employees on agitation on 11th day