गडकरींचे छायाचित्र असलेली ' ती ' पाेस्ट फेक

सिद्धार्थ लाटकर
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

वाहनधारकांनी अथवा नागरीकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये. 

सातारा ः आपण टोल नाक्‍यावर स्लिप काढताना तेथील कर्मचारी सिंगल किंवा रिटर्न अशा दोन बाजू विचारतात. तर मित्रांनो, आता आपल्याला 12 तासांच्या आतील प्रवास असेल तर रिटर्न स्लिपचे पैसे भरावे लागणार नाही या मजूकरासह केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे छायाचित्र असलेली एक पोस्ट सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.

ऐन गणेशोत्सव काळात ही पोस्ट लोकांपर्यंत पोहचल्याने पुण्यापासून कोल्हापूरपर्यंतच्या टोल नाक्‍यांवर नागरीक याबाबत विचारणा करु लागले आहेत. परंतु अशा प्रकारचा कोणताही नवीन नियम लागू झाला नसल्याची माहिती त्या-त्या टोल नाक्‍यांवरील कर्मचारी नागरीकांना देत आहेत. यामुळे काही ठिकाणी वाहन चालक आणि टोल नाका कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत.
 
दरम्यान ही पोस्ट गेल्या दोन वर्षांपासून आम्हांला वाहनचालक दाखवित असल्याचे तासवडे आणि किणी टोल प्लाझाचे व्यवस्थापक रमेश शर्मा यांनी " ई-सकाळ' शी बोलतना स्पष्ट केले. ते म्हणाले भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण 2010 च्या टोल नियमानूसार व्हायरल होत असलेल्या संबंधित पोस्ट प्रमाणे सवलतीची कोणतीही तरतूद नाही. या पोस्टमुळे वाहनधारकांची दिशाभुल होत आहे. वाहनधारकांनी अथवा नागरीकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Post faked with Gadkari's photo