मलकापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव

राजेंद्र ननावरे
बुधवार, 5 डिसेंबर 2018

मलकापूर (कऱ्हाड) : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या येथील पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण नागरीकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी) महिलांसाठी राखीव झाले आहे. मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या दालनात चिठ्ठ्या टाकून आरक्षण जाहीर झाले. आरक्षण काय पडणार याकडे लक्ष लागून राहिलेल्या अनेक मातब्बरांनी आरक्षण जाहीर होताच त्यांच्या तलवारी म्यान केल्या आहेत. थेट नगराध्यक्षपदाचे आरक्षण ओबीसी महिलेसाठी राखीव निश्चीत झाल्याने प्रभागातील लढतीवर लक्ष केंद्रीत होणार आहे. पू्र्ण बहुमतासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात मुख्य चुरस राहिल, अशी अपेक्षा आहे.

मलकापूर (कऱ्हाड) : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या येथील पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण नागरीकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी) महिलांसाठी राखीव झाले आहे. मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या दालनात चिठ्ठ्या टाकून आरक्षण जाहीर झाले. आरक्षण काय पडणार याकडे लक्ष लागून राहिलेल्या अनेक मातब्बरांनी आरक्षण जाहीर होताच त्यांच्या तलवारी म्यान केल्या आहेत. थेट नगराध्यक्षपदाचे आरक्षण ओबीसी महिलेसाठी राखीव निश्चीत झाल्याने प्रभागातील लढतीवर लक्ष केंद्रीत होणार आहे. पू्र्ण बहुमतासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात मुख्य चुरस राहिल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे दिवसेंदिवस राजकीय आखाड्यात निवडणुकीची कुस्ती अधिकच रंगतदार होणार आहे. 

मलकापूरला पालिकेचा क दर्जा प्राप्त झाल्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणुकीची प्राथमिक प्रक्रिया सुरू केली. शहरात नऊ प्रभाग आहेत. तर 19 नगरसेवक निवडायचे आहेत. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे. यासाठी आज मंत्रालयात आरक्षण सोडत होती. त्या सोडतेवेळी मलकापूरचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याचे जाहीर झाले. मलकापूर व सिंदखेडराजा अशा दोन पालिकांच्या नगराध्यक्षपदाची सोडत आज होती. त्यानुसार नागरीकांच्या मागास प्रवर्ग महिलेसाठी एक बॅकलोग शिल्लक असल्याने चिठ्ठ्या टाकून ओबीसी महिलेबाबत आरक्षण काढण्याचा निर्णय झाला. त्यानुसार दोन चिठ्ठ्या टाकल्या. त्यापैकी राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी चिठ्ठी उचलली ती मलकापूरसाठी होती. नागरीकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षण पडल्याचे जाहीर केले. सिंदखेडराजा नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपदासाठी खुले आरक्षण पडले.

पालिका जाहीर झाल्यापासून येथे नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाबाबत जोरात सुरू होती. अधिवेशनानंतर आरक्षण जाहीर केले जाईल, असे जाहीर केले होते. चार दिवसांपूर्वी  मंत्रालयात नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करणार असल्याचे पत्र येथे आले होते. त्यानुसार मंत्रालयात राज्यातील दोन पालिकांच्या आरक्षण जाहीर झाले. सत्ताधारी कॉग्रेस गटाचे मनोहर शिंदे व भाजपतर्फे अतुल भोसले यांच्या गटात चुरस आहे. सत्ताधारी शिंदे यांनी विकासाचा मुद्दा घेवून रणांगणात उतरण्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. भोसले गटाने अद्यापही त्यांची भुमिका जाहीर केलेली नाही. सत्ताधारी शिंदे विरोधकांना एकसंघ करण्यासाठी त्यांनी ताकद लावली आहे. त्यामुळे मलकापूरच्या लढतीत चुरस निर्माण होणार आहे. 

यांची वर्णी लागण्याची शक्यता...
काँग्रेसच्या मनोहर शिंदे यांच्या गटातून माजी नगराध्यक्ष मोहन शिंगाडे यांच्या पत्नी सौ. अश्विनी शिंगाडे, माजी नगरसेवक लक्ष्मण येगडे यांच्या पत्नी सौ. रेखा येगडे, माजी उपसभापती आनंदराव सुतार यांच्या पत्नी तर भाजपच्या अतुल भोसले गटातून माजी नगराध्यक्षा सौ. नूरजहा मुल्ला, सौ. दीपा राहूल भोसले व माजी नगराध्यक्षा आबासाहेब गावडे यांच्या पत्नी सौ. दीपाली गावडे यांची थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून लागू शकते

Web Title: post of nagaradhyaskh of malkapur nagarparishad is reserved for obc ladies