सोलापूर - रस्त्यांवर खड्डेच-खड्डे  रस्ते उखडले, दुभाजक तुटले 

तात्या लांडगे
गुरुवार, 19 जुलै 2018

सोलापूर : स्मार्ट सिटीत समावेश झालेल्या महापालिकेचे शहरातील रस्त्यांकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक ठिकाणी रस्ते उखडले असून काही ठिकाणी रस्त्यांवरील दुभाजक गायब झाले, तर काही ठिकाणी तुटले आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना वाहन चालविणे जिकरीचे बनले आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेक अपघातही झाले आहेत. 

शहरवासीयांना चांगल्या सुविधा देणे प्रत्येक महानगरपालिकेचे आद्य कर्तव्य असूनही सोलापूर शहरात दररोज पाणी मिळत नाही तर दुसरीकडे रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत. शहरातील व्यावसायिकांना रस्त्यालगतच्या धुळीमुळे त्रास सोसावा लागत असून खड्ड्यांमुळे वाहनांमध्ये बिघाड होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यांनीही त्याबाबत "सकाळ'च्या माध्यमातून नाराजी व्यक्‍त केली आहे. 

खड्ड्यांची अशी आहे स्थिती 
- डब्ल्यूआयटी ते अक्‍कलकोट पाण्याची टाकी : सात 
- अक्‍कलकोट पाण्याची टाकी ते दयानंद कॉलेज : 19 
- रस्त्यांवरील चेंबर गेले खोलवर : नऊ 
- दयानंद कॉलेज ते रविवार पेठ-राजेंद्र चौक : 137 
- राजेंद्र चौक-कन्ना चौक-कुंभारवेस-मधला मारुती : 23 
- टिळक चौक-बाळीवेस-शिवाजी चौक : 19 
- उत्तर सदर बझार ते दक्षिण सदर बझार : 43 

ठळक बाबी... 
- प्रमुख रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीची मलमपट्टी 
- डांबरविना मातीद्वारे खड्डे बुजविले 
- दयानंद कॉलेजलगत रस्त्यावरच नळ कनेक्‍शन नादुरुस्त 
- रस्त्यावरील दुभाजक तुटलेले तर काही ठिकाणी नाहीतच 
- रस्त्यालगतच्या कचऱ्यांमुळे धुळीचा त्रास 
- रस्त्यांवरील चेंबर रस्त्याच्या बरोबर नसल्याने वाहतुकीस अडथळा 
- प्रमुख बाजारपेठ व अंतर्गत रस्ते उखडले

Web Title: pot holes on road dividers are destroyed