अखेर सरपंचानीच बुजवला महामार्गावरील खड्डा

भारत नागणे
बुधवार, 23 जानेवारी 2019

पुणे- पंढरपूर राज्य महामार्गावरील पिराचीकुरोली पाटीजवळ (ता.पंढरपूर) रस्त्याच्या मधोमध एक मोठा खड्डा पडला होता. या खड्डयामुळे अनेक अपघात झाले आहेत. खड्डा बुजवण्यासंदर्भात येथील ग्रामस्थांनी बांधकाम विभागाला अनेक वेळा कळवून देखील दुर्लक्ष केले होते.

पंढरपूर- पुणे- पंढरपूर राज्य महामार्गावरील पिराचीकुरोली पाटीजवळ (ता.पंढरपूर) रस्त्याच्या मधोमध एक मोठा खड्डा पडला होता. या खड्डयामुळे अनेक अपघात झाले आहेत. खड्डा बुजवण्यासंदर्भात येथील ग्रामस्थांनी बांधकाम विभागाला अनेक वेळा कळवून देखील दुर्लक्ष केले होते.

धोकादायक खड्ड्यामुळे आणखी कोणाचे जीव जाऊ नयेत याच सामाजिक भावने पोटी पिराचीकुरोली (ता.पंढरपूर) येथील सरपंच कुलदीप कौलगे यांनी आज चक्क हातात फावडे घेवून सिमेंट काॅक्रीटने खड्डा बुजावला. येथील सरपंच व ग्रामस्थी ही तत्परता दाखवून नेहमीच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करणार्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.

पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरुन दररोज शेकडो वाहनांची ये-जा होते. याच मार्गावर पिराचीकुरोली (ता.पंढरपूर)  येथे मागील तीन  महिन्यापूर्वी सुमारे तीन फूट खोलीचा दोन फूट रुंदीचा मोठा खड्डा पडला होता. या खड्डायामुळे अनेक अपघात झाले आहेत. अलीकडेच याच खड्ड्यात मोटारसायकल पडून अपघात झाला होता. यामध्ये जांबूड (ता.माळशिरस) येथील  गणेश माणिक खांडेकर या तरुणाचा मृत्यु झाला आहे. तर तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आठ ते दहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

खड्यामुळे वारंवार होणार्या अपघाताची व धोकादाय खड्डा बुजवण्यासंदर्भात  सरपंच कुलदीप कौलगेसह ग्रामस्थांनी पंढरपूर येथील  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना कळवले होते. तरीही देखील बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी याकडे दुर्लक्ष केले. येथील खड्यामुळे आणखी  मोठा अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन  सामाजिक कर्तव्यापोटी सरपंच प्रदीप कौलगे यांनी  बांधकाम विभागाची वाट न पाहता पोलिस काॅन्स्टेबल आर.एच.पवार, एम.एफ शेख,सुभाष कौलगे, धनाजी गोफणे यांच्या मदतीने वाळू, सिमेंट आणि खडी एकत्रित करुन काॅक्रीटने धोकादायक खड्डा बुजवला 

सरपंच कुलदीप कौलगे यांनी  सामाजिक भान ठेवून दाखवलेल्या तत्परतेमुळे देवाच्या मार्गावरुन जाणाऱ्या अनेक भाविकांचा प्रवास सुखकर झाला आहे.

Web Title: Poteholes Repairs on the highway by Sarpanch