"कोरोना'मुळे "पोल्ट्री' व्यावसायावर संक्रात

Poultry business loss because Corona
Poultry business loss because Corona

बेळगाव - कोंबड्यांनाही कोरोना व्हायरसची लागण झाल्याची अफवा पसरल्याने सध्या खवय्यांनी चिकन खाणेच सोडून दिले आहे. त्यामुळे, कोंबड्यांच्या दरात अचानक घसरण झाली असून पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडला आहे. बेळगाव परिसरात 2,500 पोल्ट्रीचालक असून उत्पादनाच्या तुलनेत मागणीत झालेली घट पाहता व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. 

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दाखविल्यानुसार कोंबडी सोलल्यानंतर त्यात विषाणू असल्याचे दिसून येते. त्याला कोरोनाचे विषाणू म्हणून बिंबविले जात असून त्याची लागण कोंबड्यांना झाल्याची अफवा पसरविण्यात आली आहे. मात्र, पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हा दावा खोडून काढला आहे. सदर व्हिडिओ चुकीचा असून त्यात दाखविलेले विषाणू कोरोनाचे नसल्याची पुष्टी केली आहे. त्यामुळे, ही केवळ अफवा ठरली आहे. मटणाचे दर वाढले असल्याने मासाहारी खवय्यांनी चिकनला प्राधान्य दिले आहे. अशावेळेस विषाणूच्या अफवेमुळे उत्पादन जरी अधिक असले तरी मागणीत घट झाली आहे. बेळगावसह खानापूर, कित्तूर, संकेश्‍वर आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर पोल्ट्री फार्म आहेत. बेळगाव परिसरात गोव्याला रोज 25 हजारांहून अधिक कोंबड्या पाठविल्या जातात. यासह शेजारील राज्यांनाही कोंबड्यांचा पुरवठा केला जातो. मात्र विषाणूच्या अफवेमुळे त्यात घट झाली आहे. 

बर्ड फ्लूची आठवण ताजी 
यापूर्वी कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण होत होती. त्यावेळीही बेळगावातील पोल्ट्री व्यवसायावर मंदीचे सावट आले होते. अखेर पोल्ट्री व्यावसायिकांनी व पशुसंगोपन खात्याने याबाबत जनजागृती मोहीम राबविली होती. तसेच कोंबडीचे मांस चांगले शिजवून खाल्यास कोणत्याही विषाणूचा प्रभाव होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. अनेक ठिकाणी शहरात कोंबडीच्या मांसाचे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करुन ते अत्यल्प किंमतीतखवय्यांना देऊन जागृतीचा प्रयत्न झाला होता. आता पुन्हा एकदा हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. 

एक नजर 
- किरकोळ बाजारात चिकनचा प्रति किलोचा दर 180 रुपयांवरून 110 ते 120 रुपये. 
- बेळगाव परिसरात 2,500 पोल्ट्रीचालक 
- बेळगावातून गोवा, मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळूरला पुरवठा 
- प्रति महिना 80 लाख कोंबड्यांची परराज्यात निर्यात 
- जिवंत कोंबडीचा घाऊक दर 72 ते 75 रुपयांवरुन 25 ते 30 रुपयांवर घसरला. 
- दोन किलो वजनाच्या कोंबडीमागे 80 रुपयांचा फटका 

काय आहे कोरोना? 
कोरोना हा नवा विषाणू असून मानवी शरीरात प्रथमच आढळून आला आहे. ज्याला कोविड-19 या नावाने देखील संबोधले जात आहे. प्रथमच चीनमधील वुहान शहरात त्याचा प्रसार झाला असून आता तो दक्षिण आफ्रिकेलाही विळखा घालत आहे. झपाट्याने प्रसार होणाऱ्या या संसर्गजन्य विषाणूवर अद्याप परिणामकारक औषध उपलब्ध नाही. फ्लूचाच हा एक प्रकार असून ज्यात ताप खोकल्याची सामान्य लक्षणे दिसून येतात. मात्र, हा आजार प्राणघातक आहे. पण, अद्याप कुठेही कोंबड्यांमध्ये हा आजार दिसून आलेला नाही. 

कोरोनाच्या विषाणूंचा भारतात प्रवेश झालेला नाही. त्यादृष्टीने सर्वत्र खबरदारी घेण्यात आलेली आहे. अशात कोंबड्यांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार झाल्याची केवळ अफवा आहे. तसा कोणताही प्रकार घडलेला नाही. चुकीची समजूत पसरविली जात असून पशुसंगोपन खात्याकडून प्रत्येकवेळी पोल्ट्री फार्मला भेट देऊन तेथील कोंबड्यांची तपासणी केली जाते. ही केवळ अफवा आहे. 
- डॉ. शशीधर नाडगौडा, मुख्य पशुसंगोपन अधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com