इचलकरंजी येथे यंत्रमाग कामगाराचा खून

पंडित कोंडेकर
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

इचलकरंजी - येथून जवळच असलेल्या खोतवाडी (ता. हातकणंगले) येथील शिंदे मळा परिसरात खूनाचा प्रकार घडला आहे. अमोल दिलीप चव्हाण (वय 30) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर धारदार शस्त्राने तब्बल 12 वार करून निर्घृण खून करण्यांत आला. ​

इचलकरंजी - येथून जवळच असलेल्या खोतवाडी (ता. हातकणंगले) येथील शिंदे मळा परिसरात खूनाचा प्रकार घडला आहे. अमोल दिलीप चव्हाण (वय 30) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर धारदार शस्त्राने तब्बल 12 वार करून निर्घृण खून करण्यांत आला.

या प्रकरणी त्याचे वडील दिलीप गणपती चव्हाण (वय 52) शहापूर पोलिसात तक्रार दिली आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान पोलिसांनी संशयिताना पकडण्यासाठी पथके रवाना झाली आहेत.

अमोल हा अविवाहित होता. तो शिंदेमळा परिसरातील एका कारखान्यात यंत्रमाग कामगार होता. बुधवारी सकाळी आठ वाजता तो कामावर गेला होता रात्री 10 वाजेपर्यंत कारखान्यात काम करत असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.

दरम्यान, अयोध्यानगर मधील बंद पडलेल्या राइस मिलच्या समोरील रिकाम्या जागेत अमोल याचा खून झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाटगे, पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार, पोलीस निरीक्षक अरुण पोवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपासबाबत सूचना केल्या. घटनेच्या ठिकाणी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र श्वान घटनेच्या ठिकाणीच घुटमळले. 

अमोल याचे मुळगाव कराड आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून खोतवाडी येथे तो स्थायिक झाला होता. अमोलचे वडीलही यंत्रमाग कामगार आहेत. या खुन्याच्या प्रकारानंतर खोतवाडी परिसरात खळबळ उडाली असून संशयितांचा शोध शहापुर पोलिस घेत आहेत. संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर खुनाचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Web Title: power-loom worker murder at Ichalkaranji