प्रात्यक्षिक परीक्षेलाच विद्यार्थ्यांची दिवाळी 

युवराज पाटील - सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - दहावी-बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा ही विद्यार्थ्यांना सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरत असून वीस पैकी सतरा ते अठरा गुण शाळांच्या हाती असल्याने विद्यार्थ्यांना लॉटरी तर लागतेच; पण शाळांच्या निकालातही या गुणांमुळे भरमसाठ वाढ होत असल्याचे चित्र आहे. गुण खरे की खोटे याची तपासणी करणारी कोणतीही यंत्रणा विभागीय मंडळाकडे नाही. त्यामुळे शाळेने मार्कलिस्ट पाठवायची आणि मंडळाने ती स्वीकारायची असे काम वर्षानुवर्षे सुरू आहे. 

शालेय शिक्षण विभागाचे सचिव नंदकुमार यांनी अलीकडेच नागपूरमध्ये दहावीचे निकाल हे खोटे असल्याचे विधान केले होते. प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना भागाकार येत नाही. पुढे हीच मुले दहावीला बसतात आणि ऐंशी ते नव्वद टक्के गुण कसे मिळवतात, असा प्रश्‍न त्यांना पडला होता. 

यंदा बारावी परीक्षेस 28 फेब्रुवारीपासून तर दहावीच्या आठ मार्चला प्रारंभ होत आहे. भावी आयुष्यासाठी दोन्ही परीक्षा महत्त्वाच्या असल्याने विद्यार्थी रात्रीचा दिवस करून अभ्यास करतात. जे प्रामाणिकपणे अभ्यास करतात त्यांच्यासाठी प्रात्यक्षिक परीक्षा फारशी अवघड नसते. असे स्कॉलर विद्यार्थी कोण आहेत, याची माहिती शाळांना असते. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी शिक्षक हात सैल सोडतात. शाळेचा निकाल कमी लागला तर संस्थाचालकांची बोलणी खायला नकोत या उद्देशाने संबंधित विद्यार्थ्यांला काय येते, काय येत नाही याचा विचार न करता गुण दिले जातात. पुढे ऐंशी गुणांच्या लेखी परीक्षेला हेच गुण उपयोगी पडतात. एखाद्या दुसऱ्या विषयात दांडी गुल होत असेल तर प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण त्यामध्ये अधिक करून संबंधित विषयात उत्तीर्ण केले जाते. 

अशा परीक्षेचे शाळांकडे रेकॉर्ड हवे. तोंडी परीक्षेला कोणते प्रश्‍न विचारले. विद्यार्थ्याने कसा प्रतिसाद दिला याची माहिती हवी. अभ्यासक्रमाक्रवर आधारित आणि संबंधित विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीला चालना देणारे प्रश्‍न असतात, मात्र औपचारिकता म्हणून अनेक शाळांत प्रक्रिया पार पाडली जाते. मार्कलिस्ट मधील गुण पाहिले की मंडळाच्या अधिकाऱ्यांचे डोळे पांढरे व्हावे, अशी स्थिती. अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण सांगून मंडळाचे अधिकारीही प्रात्यक्षिक परीक्षेतील गुणांची फेर पडताळणीची तस्ती घेत नाही. 

ऐंशीपैकी पंधरा केवळ पंधरा 
प्रात्यक्षिकला अठरा गुण आणि लेखी परीक्षेला ऐंशीपैकी पंधरा गुणही पडत नाहीत, अशी काही विद्यार्थ्यांची अवस्था आहे. दहावी बारावीचा निकाल पाहिला की पालकांचा उर भरून येतो. पुढे मुले अडकली की हाच निकाल फुगवला होता याची कल्पना येते. विज्ञान शाखेत तीस गुण प्रात्यक्षिकासाठी असतात. अन्य विषयांसाठी वीस गुणांची परीक्षा होते.

Web Title: practical exam