असा सुरू आहे 'येथील' नंदीध्वजाचा सराव सुरू 

Nadidhwaj
Nadidhwaj

सोलापूर : येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर महाराजांच्या यात्रेला एक महिना उरला आहे. या यात्रेत नंदीध्वजाला खूप महत्त्व असते. या नंदीध्वजाचा सराव पहाटे 5.30 ते 8.30 आणि रात्री 8.30 ते 12पर्यंत सराव सुरू आहे. 
नंदीध्वज धारकांना प्रशिक्षण दिले जाते. यात प्रथमत: नंदीध्वजाचा सराव करण्यासाठी येणाऱ्याला काठी कशी ठरवायची, हे शिकवले जाते. काठी जमिनीवर ठरवल्यानंतर ती स्थिर स्वरूपात आणली जाते. त्यानंतर धारकाला पटोडा कसा बांधायचा याचे प्रशिक्षण दिले जाते. पटोडा बांधण्याच्या अगोदर धारकाच्या कंबरेला पाचोटी म्हणजे चादर बांधली जाते. पटोला बांधल्यानंतर त्याचा ताण कंबरेवर पडू नये, यासाठी पाचोटी बांधतात. त्यात ही काठी घालतात, काठी कंबरेत घातल्यानंतर सांभाळण्यास शिकवले जाते. त्यानंतर तोल सांभाळून चालण्याचे प्रशिक्षण दिले जाते. सिद्धरामेश्‍वरांच्या यात्रेतील नंदीध्वज प्रशिक्षकांनाच मास्तर म्हणतात. यात सुमारे सहा मास्तर आहेत.

हेही वाचा : महिला अत्याचारात भाजप खासदार आघाडीवर
नंदीध्वजाचे वजन

नंदीध्वज पेलून नेणे, ही सोपी गोष्ट नाही. त्यामध्ये एक प्रमुख मास्तर असतो. नंदीध्वजाचे वजन तब्बल 70 ते 100 किलोंचे असते. त्यासाठी वर्षभर व्यायाम केला जातो. यासह 20 किलोची लोखंडी साखळी नंदीध्वजाला बांधून देखील सराव केला जातो. दरवर्षीप्रमाणे यात्रेच्या सव्वामहिना अगोदर नंदीध्वज धरून चालण्याच्या सरावाला सुरवात होते. सुमारे चार-पाच किलोमीटर काठी उचलून चालायचे असल्याने तितकी ताकद लागते. त्यासाठी श्रावण महिन्यापासून जोर-बैठका, सूर्यनमस्कार, डंबेल्स यांसारखा मातीतील व्यायाम केला जातो. नंदीध्वजासाठी लागणारी काठी ही श्रीशैलच्या जंगलातून आणण्यात येते. ही काठी आणल्यावर तिला पाच वर्षे एका झाडाला बांधून ठेवण्यात येते. त्या काठीला पाच ते दहा वर्षे लवचिकपणा यावा यासाठी रोज त्यावर तेल ओतण्यात येते. 

हेही वाचा : उद्धव ठाकरेंना भेटल्यानंतर खडसेंची प्रतिक्रिया; म्हणाले...
अशी असते काठी

सुमारे पाच वर्षांनंतर ही काठी यात्रेमध्ये वापरण्यात येते. 
पहिल्या काठीची उंची : 27.50 
दुसऱ्या काठीची उंची : 28 
तिसऱ्या काठीची उंची : 28.50 
चौथ्या काठीची उंची : 29 
पाचव्या काठीची उंची : 29.50 
सहाव्या काठीची उंची : 30 
सातव्या काठीची उंची : 30.50 

यावेळेत सराव...
नंदीध्वजाचा सध्या सकाळी आणि रात्री सराव सुरू केला आहे. जो या काठीच्या सरावास येतो त्यांनाच यात्रेत काठी धरण्यास दिली जाते. नंदीध्वजाची काठी श्रीशैलच्या जंगलातून आणण्यात येते. काठीला पाच ते दहा वर्षे लवचिकपणा येण्यासाठी त्याच्यावर तेल ओतले जाते. त्यानंतरच काठी यात्रेत वापरली जाते. 
- राजशेखर हिरेहब्बू, यात्रेतील प्रमुख मानकरी 

तोल कसा सांभाळावा याचे प्रशिक्षण
प्रत्येक काठीला सहा मास्तर असतात. काठीचा सराव करण्याच्या अगोदर त्यांच्याकडून सूर्यनमस्कार, तालमीतील व्यायाम करून घेतला जातो. त्यानंतर त्यांना सुरवातीला काठी कशी ठरवायची, त्यानंतर कंबेरवर घातल्यावर तोल कसा सांभाळावा याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर विसाव्याचे प्रशिक्षण दिले जाते. 
- कुमार शिरसी, काठीचे मास्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com