मंगळवेढा - प्रदीप खांडेकर यांची सभापती पदाची वर्षपूर्ती

हुकूम मुलाणी                
सोमवार, 26 मार्च 2018

मंगळवेढा (सोलापूर) : 2017-18 मधील चौदाव्या वित्तीय आयोगाच्या 60 कोटी 91 लाखाचा निधी थेट ग्रामपंचायतकडे जमा झाला. पंचायत स्थरावर निधी वाटपाचे अधिकार नसले तरीही वर्षापुर्वी पंचायत समितीवर सत्ता मिळवलेल्या आवताडे गटाला जि.प.कडून  मोठया प्रमाणात मिळालेल्या निधीमुळे तालुक्यात विकास कामे करता येणे शक्य झाले.

मंगळवेढा (सोलापूर) : 2017-18 मधील चौदाव्या वित्तीय आयोगाच्या 60 कोटी 91 लाखाचा निधी थेट ग्रामपंचायतकडे जमा झाला. पंचायत स्थरावर निधी वाटपाचे अधिकार नसले तरीही वर्षापुर्वी पंचायत समितीवर सत्ता मिळवलेल्या आवताडे गटाला जि.प.कडून  मोठया प्रमाणात मिळालेल्या निधीमुळे तालुक्यात विकास कामे करता येणे शक्य झाले.

स्थानिक स्वराज्य संस्थेवर आवताडे गटाला पहिल्यांच सत्तेपर्यंत जाता आले सभापतीपदासाठी प्रदीप खांडेकर यांचे नाव निवडणूकीपुर्वीच चर्चेत होते. खांडेकरच्या मनमिळावू स्वभावामुळे आवताडे गटाला हुलजंती गटावर एकहाती वर्चस्व मिळून सत्तेपर्यत जाता आले सभापतीपदाला नुकतेच एक वर्ष झाले असले तरी वर्षभरात विविध योजनेच्या माध्यमातून कोटयावधी मिळवण्यात सभापती खांडेकर यशस्वी ठरले. त्यांना समाजकल्याण सभापती शिला शिवशरण यांची मोठी साथ मिळाली.

ग्रामीण जनतेची पंचायत समितीमधील कामे तातडीने निपटारा केली. रमाई योजनेत 2017-18 मध्ये 765 तर प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेत 872 घरकुल मंजूर करुन ती पुर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले. जिल्ह्यात मागासवर्गीयांसाठीच्या योजनेचा लाभ पहिल्यांदा देण्यात आला. कृषी विभागाकडील गोबरगॅस, कडबा कटर, पानबुडी मोटर व अन्य शेतीपुरक साहित्य 287 शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर देण्यात आले. तर बारामती व पुणे येथे शेतकऱ्यांना अभ्यास सहलीस पाठवले.  

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकाम पुर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करुन सहा कोटी 48  लाखाचे अनुदान थेट बॅकेत जमा करण्यात आले. लघुपाटंबंधारे खात्याकडील 14 वर्षे रखडलेले पाझर तलावाच्या नवीन सिमेंट बंधाय्राची कामे मंजूर करण्यात आली. महिलांना त्यांच्या पायावर उभा राहण्यासाठी प्रोत्साहन देत जीवनोनत्ती अभियानातून 372 बचत गटांची निमिर्ती करण्यावर भर देवून140  गटाला शासकीय भांडवल तर 25 गटाला बँकेकडून कर्जपुरवठा शिफारस केली. बांधकाम विभागाच्या वतीने तालुक्यात रस्त्याच्या कामासाठी सेसमधून 25 कामासाठी 44 लाख तर दलित वस्तीच्या 183 कामासाठी 5 कोटी 18 लाखाचा निधी मिळविला.

वैयक्तिक लाभाच्या योजनेत पात्र लाभार्थ्यालाच लाभ दिला. सेसमधून 30 हायमास्ट दिवे मंजूर केले पशुसंवर्धन विभागाकडून अरळी व नंदेश्वरच्या दवाखान्यासाठी 50 लाखा निधी मिळविला. 18 अंगणवाडयाच्या दुरुस्तीसाठी 18 लाखाचा निधी मिळविला. तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवताना 52 शाळा डिझीटल करत 90 शाळात ई-लर्निंग सुविधा केली शिष्यवृत्तीसाठी विशेष प्रशिक्षण शिबिर घेतले शिक्षकाचे प्रश्न सोडवण्यासाठी मध्यस्थी भूमिका घेतल्याने शैक्षणिक गुणवत्ता वाढली, जलयुक्त शिवारचे चांगले काम झाल्याने भुजल पातळी वाढली.

पाणी टंचाई काळात लागणारी टॅकरची संख्या घटली पंचायत समितीसह अन्य विभागात पदे रिक्त असल्यामुळे जनतेची कामे रेंगाळली जातात तरी कामे वेळेत करण्यावर भर दिला जात आहेत.

सरपंचपदाच्या कामाच्या अनुभवामुळे दामाजीचे अध्यक्ष समाधान आवताडे व बबनराव आवताडे यांनी सभापतीपदाची संधी दिली. लोकांच्या अपेक्षा मोठया असताना चौदाव्या वित्त आयोगामुळे पंचायत स्थरावर निधी मिळत नाही तरीही लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना त्यांच्या विश्‍वासाला तडा जावू न देता काम केले.पंचायत समितीला आलेल्या ग्रामीण जनतेची लुट न होता कामे वेगाने करण्यावर भर दिला. जि.प.वरील सत्तेमुळे तालुक्याला निधीही जास्त मिळाला आहे.ग्रामपंचायतीत गटा-तटाचे कमी करून दोन्ही गटाला सोबत घेवून विकासाचे पर्व सुरू ठेवण्यावर भर दिला.शासनाच्या योजनेची प्रभावी अमंलबाजणी करताना अन्य सदस्य व पंचायत समितीचे प्रशासन यांनीही मोलाचे सहकार्य केले आता आदर्श सरपंच,सदस्य,सदस्या यांना पुरस्कार देताना पंचायत समितीत सीसीटी.व्ही व ग्रामपंचायतीत बायोमेट्रीक करण्याचा संकल्प यापुढील काळात राहणार आहे, असे सभापती प्रदीप खांडेकर यांनी सांगितले.  

Web Title: pradip khandekar completed one year for sabhapati post in mangalwedha