सोलापूरच्या प्रगती सोलनकरला पराभवाचा धक्‍का 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

कन्फ्लुएंसला मिळाली दाद 
विश्‍वविनायक प्रतिष्ठान व आर्पित कथ्थक नृत्यालय यांच्यातर्फे कन्फ्लुएंस सादर करण्यात आले. यात भारतीय आणि पाश्‍चिमात्य संगीतावर कथ्थक सादर करण्यात आले. या फ्युजनने उपस्थितांची वाहवाही मिळवली. मनीषा जोशी, नागेश भोसेकर यांनी हा कलाविष्कार सादर केला. त्यांना तबल्यावर सनमित रणदिवे, ताशावर विशाल कुलकर्णी, ढोलवर कुणाल यंगल व रिद्धी देशमुख यांनी साथसंगत केली. या वेळी दिगंबर जैन गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी रिदमिक योगा सादर केला. 

सोलापूर : प्रिसिजन जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेस पात्रता फेरीतील पहिल्या फेरीतच आज सोलापूरच्या प्रगती सोलनकर हिला पराभवाचा धक्‍का बसला आहे. भारताच्याच वैदेही चौधरी हिने सरळ सेटमध्ये तिचा 6-0, 6-1 असा पराभव केला. आज एकूण आठ सामने खेळविण्यात आले. यामध्ये थायलंडच्या पुनीम कोवापिटुकटेड या विदेशी खेळाडूने विजयी सलामी दिली आहे. 

8 डिसेंबरपर्यंत कुमठा नाका येथील लॉन टेनिस कोर्टवर "प्रिसिजन सोलापूर ओपन वूमन्स आयटीएफ टेनिस टूर्नामेंट' ही 25 हजार अमेरिकन डॉलर रकमेची स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आज पात्रता फेरीतील पहिल्या फेरीचे सामने खेळविण्यात आले. या स्पर्धेत तीन कोर्टवर आज दिवसभरात सामने खेळविण्यात आले. तर, एक कोर्ट खेळाडूंना सरावासाठी राखीव ठेवण्यात आले होते. आज झालेल्या पहिल्या फेरीतील सामन्यांत भारताच्या हुमेराबेगम शेख, प्रतिभा प्रसाद, रम्या नटराजन, परिन शिवेकर, पूजा इंगळे, सोहा सादिक या खेळाडूंनी आपापले सामने जिंकत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. 

हेही वाचा : दादा म्हणाला, "धोनीबाबत आमचं पण ठरलंय' 

स्पर्धेचा निकाल 
वैदेही चौधरी (भारत) वि. वि. प्रगती सोलनकर (भारत) 6-0, 6-1, हुमेराबेगम शेख (भारत) वि. वि. आरती मुनियन (भारत) 6-2, 7-6 (3), प्रतिभा नारायण प्रसाद (भारत) वि. वि. अविका सगवाल (भारत) 6-3, 6-2, पुनीम कोवापिटुकटेड (थायलंड) वि. वि. श्रीवल्ली रश्‍मिका भमिडीपती (भारत) 6-4 6-2, रम्या नटराजन (भारत) वि. वि. लक्ष्मी साहिती रेड्डी वूटूकुरु (भारत) 6-1, 6-3, दीक्षा मंजू प्रसाद (भारत) वि. वि. रिचा दादासाहेब चौगुले (भारत) 6-2, 6-2, परिन शिवेकर (भारत) वि. वि. निदीत्रा राजमोहन (भारत) 6-3, 3-0 (सामना सोडला), पूजा इंगळे (भारत) वि. वि. श्रेया ततावर्ती (भारत) 6-3, 6-7, 12-10, सोहा सादिक (भारत) वि. वि. किआरा डिसोझा (भारत) 6-1, 6-0. 

हेही वाचा : 64 व्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत विक्रम कुराडेला सूवर्ण!

उद्‌घाटन सोहळा थाटात 
प्रिसिजन जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचा उद्‌घाटन सोहळा हवेत रंगीत फुगे सोडून सायंकाळी चार वाजता मोठ्या थाटात पार पडला. या वेळी उस्मानाबादच्या जिल्हा अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालयाचे सहसंचालक जयप्रकाश दुबले, प्रिसिजन उद्योग समूहाचे चेअरमन यतिन शहा, प्रिसिजन फाउंडेशच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, उद्योजक सिद्घार्थ गांधी, राजेश दमाणी, राज्य लॉन टेनिस संघटनेचे संयुक्त सचिव राजेश देसाई, स्पर्धेचे मुख्य पंच धारका इलावाला (श्रीलंका) आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या उद्‌घाटनानंतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे म्हणाल्या, ""सोलापुरात आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत असून ही अभिमानाची गोष्ट आहे. मोठे उद्योग समूह आणि असोसिएशन यांनी पुढाकर घेतल्या आशा चांगल्या स्पर्धांचे आयोजन केले जाऊ शकते. यामुळे चांगले खेळाडू निर्माण होतील.'' श्री. देसाई म्हणाले, आगामी काळात या स्पर्धा 50 हजार डॉलर्सची करण्याचा मानस आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pragati Solankar Shock of defeat