लोणंद: प्राजीत परदेशीने केले माउंट एहरेस्ट शिखर सर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

लोणंद - येथील गिर्यारोहक, भाजप कार्यकर्ते प्राजित रसिकलाल परदेशी यांनी जगातील सर्वात उंच व अवघड माऊंट एव्हरेस्ट शिखर आज गुरूवार (ता. १७) सकाळी सर केले. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल लोणंद नगरीमध्ये फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.

प्राजीतने लोणंद व सातारा जिल्ह्याच्या नव्हे तर राज्याच्या व देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आशा भावना व प्रतिक्रिया सर्व स्तरातून व्‍यक्‍त होत आहेत.

प्राजीत परदेशी यांची माऊंट एव्हरेस्ट ही खडतर मोहिम ७१ दिवसाची होती. ता.२० मार्च २०१८ रोजी त्यांनी  या मोहिमेस प्रारंभ केला,१७ मे रोजी भारताचा तिरंगा या शिखरावर फडकविला.या पुर्वी प्राजित परदेशी यांनी आळंदी ते पंढरपूर पायीवारी ५८ तासात पूर्ण केली व अष्टविनायक ४७० किलो मिटर अंतर १०४ तासात पूर्ण करून लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड नोंदवले आहे.

लोणंद सारख्या ग्रामीण भागातील या युवकाच्या धाडस व जिद्दीला अनेक जण सलाम करत आहेत. त्यांच्या कुटुंबीयाकडून आपल्या सुपुत्राच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. श्री. परदेशी यांच्या या यशस्वी मोहिमे बद्दल अनेकांकडून अभिमानही व्यक्त करत आहेत. या ऐतिहासिक कामगीरी बद्दल प्राजित परदेशी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर लोणंद व जिल्हयातील नागरीक व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
श्री. रमेश धायगुडे, लोणंद

Web Title: Prahlad Pardeshi climbe Mount Everest Shikhar