प्रकाश आंबेडकर म्हणाले,  भाजपच आमचा खरा विरोधक

सदानंद पाटील 
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही विरोधक मानतच नाही. आमचा खरा विरोधक भाजपच आहे. लोकांना बदल हवा आहे. त्यामुळे राज्यात वंचित आघाडी परिवर्तन करेल, असा विश्वास आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

आंबेडकर म्हणाले, राज्यात सत्ता संपादन यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. लोकं बदलाची अपेक्षा व्यक्त करत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीत आता कोणी शिल्लक राहिले नाही. त्यामुळेच मुख्यमंत्री हे वंचित आघाडीकडे विरोधी पक्ष नेते पद असेल, असे सांगत आहेत. मात्र आम्ही विरोधी पक्ष नव्हे तर राज्यातील सत्ता घेणार आहोत, असे श्री. आंबेडकर यांनी सांगितले.

आम्ही कार्यक्रम घेवून जनतेकडे जात आहोत. त्याला जनता चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशा प्रकारे जाहीरनामा घेवून कोणी जनतेकडे जात नाही, त्यामुळेच जनता चांगला प्रतिसाद देत आहे, असे आंबेडकर यांनी सांगितले.

आमचे सरकार आल्यानंतर, पोलिसांची आठ तासांची ड्युटी, आशा अंगणवाडी सेविका यांना मानधन वाढ ,पर्यावरण समतोल यासह उजाला योजनेची व्याप्ती वाढवली जाणार असून त्यासाठी १०० रुपये सबसिडी दिली जाईल, असे त्यांनी घोषित केले.
पहिल्यांदा काँग्रेसने उजाला योजना आणली. त्याची कॉपी या सरकारने केली, अशी टीका आंबेडकर यांनी केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prakash Ambedkar comment on BJP