मोदी पंतप्रधान नव्हे सरपंच - प्रकाश आंबेडकर

सुनील पाटी
मंगळवार, 8 मे 2018

आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या घडामोडी होत असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कर्नाटकमध्ये येवून चुकीच्या पध्दतीने प्रचार करत आहेत. या प्रचारामुळे मोदी हे पंतप्रधान कमी आणि एखाद्या गावचे सरपंचच जास्त वाटत आहेत. अशी टिका भारिप बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

कोल्हापूर - कर्नाटक विधानसभा निवडणूकीत सिध्दरामय्या यांना पराभूत करण्यासाठी मोठा प्रयत्न सुरू आहे. ही निवडणूक हुकूमशाही पध्दतीने लढवली जात आहे. भाजपासाठी कर्नाटक निवडणूकीचा निकाल कसाही लागला तरीही मध्यावधी निवडणूका घ्याव्या लागतील. आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या घडामोडी होत असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कर्नाटकमध्ये येवून चुकीच्या पध्दतीने प्रचार करत आहेत. या प्रचारामुळे मोदी हे पंतप्रधान कमी आणि एखाद्या गावचे सरपंचच जास्त वाटत आहेत. अशी टिका भारिप बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. कोल्हापूर प्रेस क्‍लब कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

श्री आंबेडकर म्हणाले, गेल्या आठवड्यात कर्नाटक विधानसभा निवडणूकीचा आढावा घेण्यासाठी कर्नाटक दौरा केला. या दौऱ्यामध्ये सिध्दरामय्या यांना टार्गेट केले जात असल्याचे लक्षात आले. त्यांचा पराभव कसा होईल, यासाठीच काही शक्ती काम करत आहे. लोकांचा कौल कोणाच्या बाजुने आहे, हे अजूनही स्पष्ट होत नाही. एकीकडे आंतराष्ट्रीय पातळीवर विविध घडामोडी घडत आहेत. यामध्ये भारताने काय करावे हा विचार पंतप्रधान मोदी यांच्याकडून होणे अपेक्षीत आहे. तर दुसरीकडे मोदी हे कर्नाटकमधील निवडणूकीत पंतप्रधानाऐवजी एखाद्या गावचे सरपंच असल्यासारख्या घोषणा आणि भाषणे करत आहेत. त्यामुळे ते पंतप्रधान कमी आणि सरपंच जास्त वाटत असल्याचेही टिकाही आंबेडकर यांनी केली. 

शरद पवार यांच्यावर योग्य वेळी बोलू : 
देशाचे पंतप्रधान शरद पवार असावेत का? या पत्रकारांच्या प्रश्‍नावर प्रकाश आंबेडकर यांनी योग्य वेळ आल्यावन नक्की बोलणार असल्याचे सांगितले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: prakash ambedkar criticised narendra modi in kolhapur