प्रकाश आंबेडकर यांची मंगळवेढा दुष्काळी भागाला दांडी

प्रकाश आंबेडकर यांची मंगळवेढा दुष्काळी भागाला दांडी

मंगळवेढा : बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागाला लांबुनच टाटा केला आहे. या दौर्‍यात कार्यकर्त्यात योग्य समन्वय नसल्यामुळे तालुक्यात दुष्काळी दौरा होऊ शकला नसल्याचे समजते.

नियोजित गावाऐवजी अन्य गावाची पाहणी करण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकरांनी घेतला असल्याने कार्यकत्यामधून नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्‍यात दुष्काळी परिस्थिती विचारात घेता आंबेडकर यांनी आज नंदेश्वर, गोणेवाडी, पाटकळ, खुपसंगी, भोसे या भागात दौरा करण्याचे ठरवले होते. परंतु त्यासाठी कार्यकर्ते चाळीस धोंडा या ठिकाणी थांबले होते परंतु आलेल्या गाड्यांचा ताफा तिथे न थांबता पुढे तसाच निघून गेल्यामुळे थांबलेल्या कार्यकर्त्यांचा त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे तो ताफा मंगळवेढ्याजवळ आला त्यावेळी मरवडे व हुलजंती या दोन गावांची पाहणी करण्याचा निर्णय घेतला.

निवडणुकीच्या काळात आंबेडकरांच्या प्रचारासाठी पुत्र सुजित आंबेडकरच्या प्रचार सभेचे वेळेस पावसाने दगा दिल्यामुळे नंदेश्वर गावामधे ही सभा होऊ शकली नसल्यामुळे बहुजन वंचित आघाडी नेते व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज झाले.

चुकीमुळे तालुक्याचा निश्चित भागाचा दौरा न झाल्याने कार्यकत्यांसह या भागातील ग्रामस्थ नाराज झाले. याची कल्पना त्याच्या कानावर घातली असून दुष्काळी जनतेला झालेल्या त्रासाबद्दल दिलगीर आहोत. -धनाजी सरवदे, तालुकाध्यक्ष  भारीप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com