मोदींनी आता पाकिस्तानला संपवावे : प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जून 2019

सोलापूर : "पाकिस्तानी दहशतवाद, त्यांच्याकडून भारतात पसरविला जाणारा दहशतवाद या मुद्यांवर नरेंद्र मोदींनी निवडणूक जिंकली. त्यामुळे जागतिक स्तरावरील संभाव्य दबाव झुगारून मोदींनी आता पाकिस्तानला संपवावे आणि लोकांनी त्यांच्यावर दाखविलेला विश्‍वास सार्थ करावा'', असे मत वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज (गुरुवारी) येथे व्यक्त केले. 

ऍड. आंबेडकर गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर होते. शासकीय विश्रामधाम येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले,"लोकसभा निवडणूक प्रचाराच्या दरम्यान मोदींनी दहशतवादाचा मुद्दा महत्त्वाचा केला होता. मतदारांनाही त्यांच्या हातात पुन्हा सत्ता दिली. भारताला सातत्याने दहशतवादाला सामोरे जाण्याची वेळ आणणाऱ्या पाकिस्तानला संपविण्याची ही चांगली संधी आहे आणि दहशतवादाला संपविण्याच्या त्यांच्या भूमिकेला संपूर्ण देश पाठिंबा देईल.'' 

पाकिस्तानला संपविण्याच्या कार्यवाहीबाबत आंतरराष्ट्रीय दबाव येणार नाही का, असे विचारले असता ऍड. आंबेडकर म्हणाले,""आज जगातील बहुतांश देश दहशतवादाच्या समस्येने त्रस्त आहे. जे देश पाकिस्तानच्या कारवाईला विरोध करतील, त्यांना, "तुमच्या देशातील दहशतवाद संपवायचा नाही का', अशी विचारणा करावी. आपल्या देशातील लोक उपाशी राहिले तर कोणताही देश प्रत्येकाचे पोट भरण्यासाठी पुढे येणार नाही. त्याची व्यवस्था आपणालाच करावी लागेल. त्यामुळे आपल्या देशाला सतावणारा दहशतवाद कायम स्वरुपी मिटवायचा असेल तर, पाकिस्तानला संपविणे योग्य होणार आहे.'' 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prakash Ambedkar suggested Narendra Modi about Pakistan