सरकारने साखरेला हमीभाव द्यावा - प्रकाश आवाडे

सरकारने साखरेला हमीभाव द्यावा - प्रकाश आवाडे

हुपरी - केंद्र व राज्य सरकारने साखरेला हमीभाव द्यावा, उसाला जास्त भाव कसा द्यायचा ते आम्ही बघू, असे स्पष्ट करून शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या सरकारला दणका देण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले. 

येथील जवाहर कारखान्याची २९ वी वार्षिक सभा आज कारखाना कार्यस्थळावर झाली. संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे प्रमुख उपस्थित होते. कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांनी मागील इतिवृत्त, तसेच सभेपुढील विषयांचे वाचन केले. विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर केले.

ते म्हणाले, ‘ जवाहर सहकारी साखर कारखान्याने २५ वर्षांत कायद्याने द्याव्या लागणाऱ्या ऊस दर रकमेपेक्षा १ हजार १७ कोटी रुपयांहून अतिरिक्त रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली. गतवर्षीपेक्षा पाच हजार हेक्‍टर जास्त म्हणजे २३ हजार हेक्‍टर उच्चांकी उसाची नोंद चालू हंगामासाठी झाली. यंदा सभासदांबरोबरच बिगर सभासद ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति टन अर्धा किलो साखर देणार.’’

कल्लाप्पाण्णा आवाडे, अण्णासाहेब चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. सभेला उत्तम आवाडे, किशोरी आवाडे, सपना आवाडे, राहुल आवाडे, अशोकराव सौंदत्तीकर, विलासराव गाताडे, मुख्य कार्यकारी अधिकारी बबलू कलावंत, किरण कांबळे, प्रतापसिंह देसाई, आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com