हातवाल्यांचा बाणाचा प्रचार मान्य नाही

हातवाल्यांचा बाणाचा प्रचार मान्य नाही

कोल्हापूर - महापालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक थेट शिवसेना उमेदवाराच्या प्रचारात उतरल्याची कृती पक्षाला मान्य नाही. त्यामुळे उद्या (ता. १९) आमदार व पालिकेतील काँग्रेस आघाडीचे प्रमुख सतेज पाटील यांची भेट घेणार असल्याचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘‘गेले दोन दिवस मी बाहेरगावी आहे. उद्या (ता. १९) कोल्हापुरात परत येणार आहे. महापालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक थेट शिवसेना व्यासपीठावर गेल्याचे आज आपल्याला कळाल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘‘सतेज पाटील काँग्रेसविरोधात नाहीत; पण त्यांची आताची जी भूमिका आहे ती त्यांच्या वैयक्तिक कारणातून आहे. त्याचे पडसाद आता उमटत आहेत. मी स्वतः या संदर्भात काँग्रेसच्या शहर व जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांशी बोलणार आहे.  त्यानंतर मी सतेज पाटील यांची भेट घेणार आहे व त्यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यांच्याशी थेट चर्चेतूनच या परिस्थितीत फरक पडू शकेल, असा माझा विश्‍वास आहे.’’

दरम्यान, काँग्रेसच्या नगरसेवकांनी पडद्याआड न राहता उघडपणे राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचे पडसाद आज मतदारसंघात उमटले. खुद्द आमदार सतेज पाटील यांनीच आपल्याला आदेश दिल्याचे या नगरसेवकांनी जाहीर सभेत सांगितले. त्यामुळे प्रचाराची दिशाच स्पष्ट झाली.

शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांचे चिरंजीव माजी महापौर सागर चव्हाण हे देखील शिवसेनेच्या व्यासपीठावर हातात हात घालून उभे आणि हात उंचावत राहिल्याने त्यातूनही वेगळा संदेश काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर गेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com