Karhad
Karhad

कऱ्हाडमध्ये सव्वा लाखाच्या दागिण्यांच्या प्रामाणिकपणाचा प्रकाश

कऱ्हाड : रस्त्याने जाताना एखादी वस्तू सापडली तर ती प्रमाणिकपणे परत केली जाईल, याची गॅरेंटी कमी आहे. मात्र कऱ्हाडमध्ये एका युवकाने त्याला सापडलेली पर्स व त्यात असणारे सव्वा लाखाचे दागिने संबधित महिलेचा शोध घेवून परत केले.

येथील रविवार पेठेतील प्रकाश साळुंखे असे संबधित महिलेला पर्स परत करणाऱ्या युवाकाचे नाव आहे. सौ. मंगल शशिकांत बेंद्र असे पर्स हरवलेल्या महिलेच नाव आहे. आज सकाळी आठच्या सुमारास संबधित महिलेस ती पर्स प्रकाश व त्यांच्या मित्रांनी परत केली. त्यावेळी त्या महिलेच्या चेहऱ्यावर आंनदाची लहर झळकून गेली. समाजात प्रमाणिकपणा नाही, अशे म्हणणाऱ्यांना कऱ्हाडमध्ये मात्र सव्वा लाखाच्या दागिण्यांचा प्रमाणिकपणाचा प्रकाश झळकल्याचेही जाणवून गेले. 

बेंद्र येथील मुळीक गल्लीत राहतात. त्यांचे भाऊ बबन विभुते येथे पायर्या खालील भागात राहतात. त्यांच्या घरी त्यांच्या मुलाचा विवाह समारंभामुळे घरी गडबडीचे वातावरण आहे. त्यात काल रात्री सौ. बेंद्रे भावाच्या घरून त्यांची मुलगी स्वाती यांच्या सोबत बाहेर पडल्या. दुचाकीवरून जाताना त्यांची पर्स पडली. वास्तिवक अन्य साहित्यामुळे पर्स पडल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. ती पर्स येथील एशोक चैकानजीकच पडली होती. त्याच भागात राहणारे प्रकाश साळुंखे यांना ती सापडली. त्यांनी ती पस्र घरी नेली. घरातही त्याबाबत सांगितले. पत्ता शोधण्यासाठी त्यांनी ती पर्स उघडली. त्यावेळी त्यात चार तोळ्याचे सोन्याचे गंठण, पाचशेच्या काही नोटा, आधारकार्डे व अन्य साहित्य अशा सुमारे सव्वा लाखाचा एवेज त्यात होता. त्यांनी आधार कार्डेवरून शोधाशोध सुरू केली. मुळीक गल्ली हा पत्ता असल्याने तेते जावून चौकशी केली. मात्र तरिही त्या ावाची व्यक्ती कोणाच्या लक्षात आली नाही. त्यांनी काही मित्रांना फोन केले. तरिही संदर्भ लागला नाही. अकेर त्यांना सामाजिक कार्यकर्ते  प्रमोद तोडकर यांच्यासह काही लोकांनी संदर्भ दिली. त्याचवेळी प्रकाश व त्यांच्या मित्रांनी बसस्थानकावरही काही लोकांकडे चोकशी सुरू केली. त्यावेळी ती पर्स व ती व्यक्ती बबन विभुते यांची बहिण आहे, असे स्पष्ट झाले. श्री. विभुते यांचा नाश्ताच्या हातगाडा बसस्थानकावर आहे. त्यांनी तेथे जावून चौकशी केली. त्यावेळी पर्स हरवल्याची खात्री झाली. प्रकाश सकाळी व्यायाम करून हॉटेल प्रेमसागर येथे आले. त्यांनी तेथए बबन विभुते व त्याची बहिण सौ. बेंद्र यांना बोलावले. त्यांनी मनसेचे शहराध्यक्ष सागर बर्गे यांच्यासमोर पर्स दिली. त्या पर्समधील वस्तू तपासून पाहयला सांगितल्या. त्या जशाच्या तशाच होत्या. पर्स सापडल्याने सौ. बेंद्रे यांच्या चेहऱ्यावर हास्याची लेकर उमटली. त्यांनी काही रक्कम भक्षीस म्हणू देण्याचा प्र.यत्न केला. मात्र प्रकाश यांनी त्यास नकार दिला. मात्र त्याचवेळी ती रक्कम एखाद्या गरीब मुलीच्यालग्नात द्यावी, अशी सुचनाही केली. समाजातील प्रमाणिकपमाबद्दल होणाऱ्या चर्चेला भेद देणारी गोष्ट कऱ्हाडमध्ये घडली त्यामुळे सव्वा लाखाच्या दागिण्यांच्या प्रमाणिकपणाचा प्रकाशही येथे अनुभवयास मिळाला. 

काल रात्री घरी जाताना पर्स सापडली. ती पर्स घरी नेवून दाखवली. त्यावेळी घरच्या लोकांनाही ती पर्स ज्याची आहे. त्यांना परत देण्यासाठी मला मदत केली. त्याशिवाय मित्रांना सांगितले होते. त्यांनीही पर्स कोणाची आहे. ती शोधण्यासाठी मदत केली. त्यामुळे खऱ्या मालकापर्यंत पर्स पोचल्याचे समाधान आहे. 
- प्रकाश साळुंखे, कऱ्हाड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com