बालकाचे अपहरण करून निघृण हत्येप्रकरणी न्याय देण्याचे प्रणिती शिंदे यांचे आश्वासन

Praniti Shindes assurance to give justice in kidnapping children and murder case
Praniti Shindes assurance to give justice in kidnapping children and murder case

मंगळवेढा : तालुक्यातील माचणूर येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. शिवशरण कुटूंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोत्परी मदत करेन असे आश्वासन आ. प्रणिती शिंदे यांनी दिले.

या हत्येची घटना घडून दोन आठवडे झाले. तरीही पोलिसाचा तपास सुरू असून मारेकरीचा अद्याप शोध लागला नसल्याने प्रतिकच्या हत्येने दुखात असलेल्या शिवशरण कुटूंबाची भेट घेवून सांत्वन केले. यावेळी सो. म. पा. गटनेते चेतन नरोटे, शिवाजी कांळूगे सर, सोलापूर जिल्हा काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे जिल्हा अध्यक्ष गौरव खरात, राजेश पवार, अरिफ पठाण, अंकुश जगताप, लक्ष्मण भालेराव, मिथून राठोड, जनार्दन शिवशरण व माचणूर परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. शिंदे म्हणाल्या की प्रतिकच्या हत्येप्रकरणातील आरोपीचा अद्यापही शोध लावण्यात पोलीसांना यश आले नाही.

याप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लवकरात लवकर आरोपींना अटक करूण या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. जोपर्यंत त्या मारेकऱ्यांचा शोध लागत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही व तसेच यावेळी माचणूर गावातील ग्रामस्थानी या निर्घ्रुण हत्येचा तपास सीआयडी व सीबीआ कडे सोपवून त्वरीत मारेकऱ्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com