प्रतिबिंब फिल्म फेस्टीव्हलमध्ये द लँड बाय द सी, अपूर्ण विराम, प्रक्रिया प्रथम

Pratibimb Film Festival at The Land by the Sea first
Pratibimb Film Festival at The Land by the Sea first

नगर : तेराव्या प्रतिबिंब लघूपट व माहितीपट महोत्सवात द लँड बाय द सी या माहितीपटाला, खुल्या गटात प्रक्रिया तर विद्यार्थी गटात अपुर्ण विराम लघूपटाने प्रथम क्रमांक पटकावले. तर पाळी एक रहस्य या लघूपटाला ज्युरी अवार्ड देण्यात आला.
येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात १३ वा प्रतिबिंब लघुपट व माहितीपट महोत्सव पार पडला.


या कार्यक्रमासाठी सिनेपत्रकार दिलीप ठाकुर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, लोकांचा एका ठिकाणी बसण्याचा वेळ खुप कमी झाला आहे. त्यामुळे लघुपटाला भविष्यात चांगले दिवस येतील.

व्यंकटेश म्हणाले...

ज्योती व्यंकटेश म्हणाले की, ग्रामीण विद्यार्थ्यांनी मराठीसोबत हिंदी विषयातही लघुपटनिर्मिती करावी. कारण राष्ट्रभाषा हिंदी असल्यामूळे आपला विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकेल.


यावेळी  कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र दरे यांनी अध्यक्षीय भाषणातून सहभागी लघुपट व माहितीपट निर्मात्यांचे अभिनंदन केले.

यांच्या हस्ते वितरण
यावेळी संस्थेचे विश्वस्त जयंत वाघ, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.ए.के पंदरकर, प्रा. आर.जी. कोल्हे, प्रतिबिंब महोत्सवाचे संचालक प्रा. अभिजीत गजभिये उपस्थित होते.
यावेळी प्रतिबिंब लघूपट व माहितीपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघूपट, माहितीपट यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषक वितरण करण्यात आले.

असा आहे रिझल्ट

द लँड बाय द सी (केरळ) खडू शिल्प व फंडे हवा पंक्चर यांनी अनुक्रमे प्रथम व व्दितीय व स्पेशल ज्युरी अवार्ड  पटकावला. खुल्या गटात बेस्ट शॉर्ट्फिल्म अपूर्ण विराम (बीड)  द्वितीय रनरअप कन्यादान तर स्पेशल  ज्युरी अवार्ड मर्मबंधातली ठेव ही या लघुपटाला मिळाला.


यासोबतच विद्यार्थी गटात बेस्ट शॉर्ट्फिल्म प्रक्रिया (पुणे), स्पेशल ज्युरी अवार्ड पाळी या लघुपटाला तर बेस्ट दिग्दर्शक शुभम सवईवार (प्रक्रिया) तर बेस्ट सिनेमॅटोग्राफर निरांजन सी(प्रक्रिया) यांना देण्यात आला.


यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे  यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संज्ञापन विभागाचे प्रमुख प्रा. संदीप गिऱ्हे यांना तर सुत्रसंचालन प्राची शेकटकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. अभिजीत गजभिये यांनी व्यक्त केले. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी  विभागाचे डॉ. बापू चंदनशिवे, प्रा. अनंत काळे, श्वेता बंगाळ, सुमीत भिंगारे यांनी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com