पोहायला गेलेला युवक बहे कृष्णा पुलाजवळ वाहून गेला 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

इस्लामपूर - वाळवा तालुक्‍यातील बहे येथील कृष्णा पुलाजवळून आज दुपारी दोनच्या सुमारास एक युवक वाहून गेला. मित्रांच्या सोबत पोहायला गेल्यावर ही घटना घडली. प्रतीक पोपट आवटे (वय 17, मूळगाव आमणापूर, ता. पलूस, सध्या रा. यल्लाम्मा चौक, इस्लामपूर) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, प्रतीक हा सध्या त्याचा मामा उदय अरविंद मस्के (रा. यल्लाम्मा चौक, इस्लामपूर) यांच्याकडे रहात होता. नववी नंतर त्याने शाळा सोडली होती. त्यामुळे गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून तो इस्लामपुरात मामांच्याकडे रहात होता. दुपारी घरी काहीही न सांगता तो मित्रांच्या सोबत बहे पुलानजीक कृष्णा नदीत पोहायला गेला होता.

नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. हे युवक बांधाऱ्यावरून नदीत उड्या टाकून पोहत होते. बंधाऱ्याशेजारी पाण्याला खूप गती आहे आणि नदीत खडक असल्याने तो वाहून गेल्याचा अंदाज आला नाही. बऱ्याच वेळानंतर मित्रांच्या लक्षात आल्यावर मित्रांनी त्याच्या मामाला घडलेला प्रकार सांगितला. दुपारपासून त्याचे नातेवाईक आणि इस्लामपूर पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्री उशिरापर्यंत तो मिळून आला नाही. रात्री उशिरा त्याचे मामा अरविंद मस्के यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

प्रतीकचे वडील आमणापूर येथे शेती करतात. आई-वडील, एक बहीण असा त्याचा परिवार आहे. प्रतीक एकुलता एक असल्याने त्याच्यावरती सर्वांचा जीव होता. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pratik Awate flowed in Krisna River near the Bahe bridge