mangalwedha
mangalwedha

मंगळवेढा : प्रतिक शिवशरण हत्येप्रकरणी अद्याप अटक नाही

मंगळवेढा : प्रतिक शिवशरण हत्याप्रकरणातील मारेकऱ्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. दरम्यान अटकेसाठी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर सुरु असलेले धरणे आंदोलनास सभापती प्रदीप खांडेकर यांनी पाठिंबा देत आरोपीच्या अटकेची मागणी केली. दरम्यान सायंकाळी बहुजन नेते राजाभाऊ सरवदे व लक्ष्मण ढोबळे यांनी नातेवाईकाची भेट घेत मारेकरी न सापडल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

दिवाळीच्या तोंडावर अजूनही शोध न लागल्याने पोलिसही तणावात असून तपासकार्य विचलीत होवू नये, म्हणून याबाबत अधिक बोलण्याचे टाळत आहेत. मारेकऱ्यांचा तपास करावा म्हणून पोलिस अधिकारी पोलिस ठाण्यात न थांबता तपासासाठी सिध्देश्‍वर नगरी माचणूरमध्ये ठाण मांडले असून हत्येप्रकरणातील मारेकरी न सापडल्याने बोलके असलेले गाव मुके झाले असून मोबाईलवरुनही जादा संवाद होत नाही. यातील आरोपीचा तपास करण्यास पोलिसांना अद्यापही यश आले नाही.

आरोपी बरोबर मृतदेहाचा गायब केलेला पाय शोधून नातेवाईकाच्या ताब्यात देणे हे आव्हान असल्याने गोपनीयरित्या कसून चौकशी सुरू केली असून माचणूर मुक्कामी असलेल्या पोलिसांकडून याबाबत काही माहिती याची ग्रामस्थाकडून महिती घेतली जात आहे. ठोस काही सापडल्याशिवाय आरोपीच्या अटकेबाबत स्पष्ट केले जात नाही, पण प्रतीकच्या हत्येमागील कारणाचा शोध महत्त्वाचा असल्याने गावकऱ्यांच्या दिवाळी सणावर सावट आले. आज याबाबत या संघटनेच्या वतीने या हत्येचा प्रकार सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या कानावर घातला असून त्यांनीही मारेकऱ्यांच्या अटकेबाबत पोलिस महासंचालक व विशेष महानिरीक्षक यांना लक्ष घालण्याच्या सुचना देणार असल्याचे सांगितले.

आंदोलनस्थळी विविध संघटनेच्या वतीने आरोपीच्या अटकेसाठी पाठींबा दिला जात आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर प्रतिकच्या हत्याप्रकरणाने तालुक्याला कलंब लागला असून आरोपीला अटक लवकरात लवकर करावी अशी मागणी सभापती प्रदीप खांडेकर यांनी केली. आमच्या दोन पथकासह स्थानिक पोलिसांकडून तपास सुरुच आहे, असे पोलिस निरीक्षक गुन्हे गुन्वेषण विभागाच्या विजय कुंभार यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com