शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी जनआंदोलन उभारणार- प्रवीण माने

राजकुमार  थोरात
शनिवार, 8 डिसेंबर 2018

वालचंदनगर - उजनी जलाशयातील पाण्याचे फेरनियोजन केल्यामुळे  उजनी जलाशयातील खासगी उपसा क्षेत्रातील बॅक वॉटरच्या शेतकऱ्यांचे १.९७ टीएमसी पाणी कमी  होणार असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी जलआंदोलन उभारणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समिती सभापती प्रवीण माने दिली.

कळाशी (ता.इंदापूर) येथे उजनीकाठच्या शेतकऱ्यांची पहिली बैठक पार पडली. यावेळी माने यांनी सांगितले की,उजनी जलाशयातील खासगी उपसा क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी  राखीव असलेल्या पाण्यातील १.९७ टीएमसी पाणी, व प्रस्तावित लाकडी -निंबोडी उपसा सिंचन योजनेचे ०.३३ टीएमसी पाणी असे २.३३ टीएमसी पाण्याचे फेरनियोजन ३ ऑगस्ट २०१८ च्या पत्रानुसार करुन  तिसऱ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आले आहे. बॅक वॉटरचे कमी झालेले २.३३ पाणी सोलापूर जिल्हातील प्रवाही (कालव्याच्या) क्षेत्रासाठी वापरण्यात येणार आहे. यामुळे उजनी जलाशयाच्या बॅक वॉटरच्या शेतकऱ्यांना पाणी अपुरे पडणार असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. उजनीचे हक्काचे पाणी कमी झाल्यामुळे  बागयती क्षेत्रामध्ये घट होण्याची शक्यता असून याचा थेट परीणाम शेतकऱ्यांच्या प्रपंचावरी होणार असून सिंचन क्षेत्र कमी होणार असल्याने उजनीच्या हक्काच्या पाण्यासाठी जनआंदोलन उभारणार असल्याचे माने यांनी सांगून उजनीच्या पाण्याबाबत भूमिका स्पष्ट केली. यावेळी शेतकऱ्यांनी जनआंदोलनास पाठिंबा देवून राजकारण न करताना पाण्यासाठी एकजूटीने लढण्याचा निर्धार केला.

यावेळी राजेंद्र गोलांडे, मुंकुंद रेडके जितेंद्र गिड्डे, किरण देवकर, दादा भालेकर, उत्तरेश्‍वर गोलांडे, भारत बोंगाणे, अप्पा गोळे मारुती भोई, शिवाजी भोई  उपस्थित होते.

Web Title: Pravin Mane will set up a mass movement for water rights of farmers