बा विठ्ठला... शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होऊ दे...... 

बा विठ्ठला... शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होऊ दे...... 

पंढरपूर ः बा.. विठठला राज्यात नव्याने स्थापन झालेल्या उध्दव ठाकरे सरकारला शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करण्याची आणि मराठा समाजातील तरुणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची सुबुद्धी दे.., असे साकडे आज सकल मराठा समाज समन्वय समितीचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी विठ्ठल रुक्‍मिणी चरणी घातले. यावेळी त्यांनी शेतीमालाला हमीभाव आणि अरबी समुद्रात उभारण्यात येणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम तातडीने सुरु करावे, अशी मागणीही त्यांनी केली. 
हेही वाचा ः उद्धव ठाकरे यांनी स्विकारला मुख्यमंत्रीपदाचा पदभार
शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी गुरुवारी (ता. 28) महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर त्यांच्यापुढे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाला हमी भाव देण्याचे मोठे आव्हान आहे. ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच, विविध समाजिक आणि शेतकरी संघटनांनी संपर्ण कर्ज माफी देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. याच मागणीसाठी सकल मराठा समाज आरक्षण समन्वय समितीचे राज्य समन्वयक गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह विठ्ठल रुक्‍मिणीला साकडे घालतले. 
हेही वाचा ःपोलिस आयुक्तलयाकडून 20 अधिकाऱयांच्या बदल्या
सकल मराठा समाज समन्वय समितीच्या वतीने राज्यभरात आरक्षण प्रश्नी आंदोलन केले होते. आंदोलना दरम्यान फडणवीस सरकारने सुमारे 13 हजार 700 तरुणांवर गुन्हे दाखल केले आहेत. दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी करुनही अद्याप पर्यंत गुन्हे मागे घेतले नाहीत. मागील आषाढीवारी वेळी गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी गायकवाड यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपुरात महापूजेसाठी येऊ देणार नाही असा इशारा दिला होता. त्यावेळी गायकवाड यांना पोलिसांनी अटक करुन कारवाई केली. 
राज्यात सत्तांतर झाले आहे.शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार स्थापन झाले आहे. त्यानंतर मराठा समन्वय समितीने संपुर्ण कर्ज माफी आणि मराठा समाजातील तरुणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. यावेळी आकाश पवार, सचिन कडलासकर, शंकर मोहिते, विक्रम वाघमारे, नवनाथ निकम, दिपक शेळके, चंद्रकांत चव्हाण, सिताराम कवडे, किशोर आवटे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com