दुधदरवाढीसाठी तहसिलदार कार्यालयावर बांधणार भाकड जनावरे

सनी सोनावळे
बुधवार, 30 मे 2018

टाकळी ढोकेश्वर (नगर): 1 जून 2017 रोजी राज्यातील ऐतिहासिक शेतकरी संपानंतर राज्य सरकारने जाहिर केलेला प्रतिलीटर 27 रूपये दर दुधउत्पादक शेतकऱ्यांना मिळत नसल्याने भूमिपुत्र शेतकरी संघटना व दुध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने एक जून रोजी संपुर्ण राज्यभर तहसिल व जिल्हाधिकारी कार्यालयांवर भाकड जनावरे बांधण्याचे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहीती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष वाडेकर व प्रदेश प्रवक्ते अनिल देठे यांनी दिली.

याबाबत माहीती देताना देठे यांनी सांगितले की, राज्य सरकारने जाहिर केलेला प्रतिलीटर 27 रूपये दर दुधउत्पादक शेतकऱ्यांना मिळत नसून उलटपक्षी त्यामध्ये प्रतिलीटर दहा रूपयाने घट झाली आहे. राज्य सरकारकडे वारंवार दुधदरवाढीची मागणी करून व राज्यभर मोफत दुध वाटप सप्ताह करूनही सरकार दुधदरवाढ करत नसल्याने संघटना व दुध उत्पादक संघर्ष समिती एक जुनला राज्यातील तहसिल कार्यालयांवर भाकड जनावरे बांधणार आहे.

सरकारने तरीही दखल न घेतल्यास पाच जूनला मुंबई येथे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या घरासमोर दुग्धाभिषेक सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांनी पारनेरच्या तहसील कार्यालयावरील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संतोष वाडेकर यांनी केले आहे.

Web Title: Predatory cattle to build tahsildar office for milk growers