कोल्हापूरः गर्भवती महिलेचा सीपीआरमध्ये मृत्यु 

राजेश मोरे
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

कोल्हापूर - नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेला खासगी रूग्णालयातून सीपीआरमध्ये दाखल केले. पण उपचारापुर्वीच तिचा मृत्यु झाला. राजश्री गिरीश पोवार (वय 26, रा. अंबाई टॅंक) असे त्या मृत गर्भवती महिलेचे नाव आहे.

कोल्हापूर - नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेला खासगी रूग्णालयातून सीपीआरमध्ये दाखल केले. पण उपचारापुर्वीच तिचा मृत्यु झाला. राजश्री गिरीश पोवार (वय 26, रा. अंबाई टॅंक) असे त्या मृत गर्भवती महिलेचे नाव आहे.

डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळेच हा मृत्यु झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला व सीपीआरमध्ये गोंधळ घातला. नातेवाईक महिलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटुन टाकणारा होता. सीपीआरमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

याबाबत घटनास्थळी व पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की, राजश्री पोवार या नऊ महिन्याच्या गर्भवती होत्या. त्यांच्यावर कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांना शस्त्रक्रियेसाठी रूग्णालयात बोलावले होते. डॉक्‍टरांनी काही प्रमाणात उपचारही केले. पण त्यांची प्रकृती आणखीनच खालवली. त्याच रूग्णालयातील डॉक्‍टर नातेवाईकांसमवेत गर्भवती राजश्री पोवार यांना पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये घेऊन आले. येथे उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला. खासगी सहसीपीआरमधील डॉक्‍टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्यामुळे राजश्री यांचा मृत्यु झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. हा धक्का सहन न झाल्याने त्यांचे पती व सासरे चक्कर येऊन खाली पडले. याबाबत संबधीत डॉक्‍टरांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला त्यामुळे सीपीआरमध्ये तणाव निर्माण झाला. 

Web Title: Pregnant woman death in CPR