'प्रेमरंग' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

madha
madha

माढा (सोलापूर) - अलिकडच्या काही वर्षांत ग्रामीण भागातील कलाकरांनी चित्रपट सृष्टीवर आपला वेगळा ठसा उमटलेला आहे. त्यात भर पडली असुन, उपळाई बुद्रूक येथील शरद गोरे यांनी ८ फेब्रुवारी रोजी दिग्दर्शित होणाऱ्या 'प्रेमरंग' या चित्रपटात कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन, संगीत, नृत्य दिग्दर्शन, दिग्दर्शक व निर्माता अशा तब्बल नऊ भूमिका समर्थपणे बजावल्या आहेत. एकाच चित्रपटात तब्बल नऊ जबाबदाऱ्या पार पाडत मराठी चित्रपटसृष्टीतील विक्रमच केला आहे. 

साहित्यिक असलेले शरद गोरे यांचा जन्म उपळाई बुद्रूक येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण उपळाईच्या जिल्हा परिषद शाळेत तर माध्यामिक सातवीपर्यंतचे शिक्षण नंदिकेश्वर विद्यालयात झाले. सततच्या दुष्काळी परिस्थितीला कंटाळून त्यांच्या कुटुंबियांना उदरनिर्वाहासाठी कामाच्या शोधार्थ पुणे येथे गेले. त्यांनी नामांकित कंपनीच्या एका शाखेत मॅनेजर या पदावर ८ वर्ष काम केले. परंतु, कॉलेज जीवनापासुन कविता करणे, भाषण, अभिनय आणि संगीताची आवड होती. त्यामुळे या क्षेत्रात त्यांचे मन रमत नव्हते. याचकाळात 'मृत्युंजयकार' प्रा शिवाजी सावंत यांचा सहवास त्यांना लाभला. व त्यांच्या प्रभाव जीवनशैलीवर झाला. त्यामुळे कलेला प्राधान्य देत. ती जोपसण्याचा मनी दृढ निश्चय करत त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. साहित्यिक क्षेत्राबरोबर चित्रपटसृष्टीत त्यांनी पाऊल टाकले.

प्रथमतः त्यांनी 'रणांगण एक संघर्ष' या चित्रपटासाठी लेखक व दिग्दर्शन केले. तसेच पंखांतलं आकाश, उत्तरपुजेची महापूजा, अन्नदान की पिंडदान या लघु चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले. द शिवाजी मॅनेजमेंट गुरू या नाटकात प्रेम, माझी सखी, या अल्बमला गीत लेखन व संगीतकार म्हणून त्यांनी काम केले. तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून गेल्या २५ वर्षांपासून ते कार्यरत आहेत. प्रिय प्रिये, प्रेम हे त्यांचे गाजलेले काव्यसंग्रह आहेत. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेला बुधभूषण हा अत्यंत दुर्मिळ व महत्त्वपूर्ण ग्रंथ त्यांनी मराठीत काव्य भाषांतरित केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या की हत्या त्यांचे हे पुस्तक ही प्रकाशित झाले आहे. 

जि.एस.एम. फिल्म्स निर्मित 'प्रेमरंग' या चित्रपटात शरद गोरे यांनी तब्बल नऊ भूमिका समर्थपणे बजावल्या आहेत. या चित्रपटात सोलापुरची विनिता सोनवणे मुख्य नायिकेच्या भुमिकेत तर बार्शीचा रमाकांत सुतार हा खलनायकाच्या भुमिकेत आहेत. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यामुळे प्रशासकीय क्षेत्रात दबदबा असलेल्या उपळाई बुद्रूकचे नाव चित्रपट सृष्टीत देखील नावलौकिकास येणार आहे. 

कुठल्याही क्षेत्रात मेहनत घेतली की, तर नक्कीच यशाला गवसणी घालू शकता. न थांबता न थकता प्रयत्न करत रहा. 
- शरद गोरे,  प्रेमरंग चित्रपटाचे निर्माते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com