अपात्र नगरसेवकांबाबत सरकारची वटहुकूम काढण्याची तयारी - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - अपात्र नगरसेवकांसंबंधी तातडीने वटहुकूम काढण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी आज दिले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांनी अपात्र नगरसेवकांच्या कारवाईबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी वरील आश्‍वासन दिले.

जातवैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न करणाऱ्या राज्यभरातील सुमारे ९ हजार सदस्यांचे पद सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने रद्द झाले. कोल्हापूर महापालिकेतील १९ सदस्यांचा समावेश आहे. काँग्रेसच्या ७, राष्ट्रवादीच्या ४, भाजपच्या ४, ताराराणी आघाडीच्या १, शिवसेनेच्या एका सदस्याचा समावेश आहे. कायद्यात बदल करून हा प्रश्‍न निकालात निघणार असेल, तर त्यासंबंधी कार्यवाही करू, असे आश्‍वासन पालकमंत्र्यांनी दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधीच्या याचिका निकाली काढल्या आहेत. अंतिम निर्णय राज्य सरकारच्या हाती आहे. सध्या जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सहा महिन्यांची आहे. कायद्यात बदल करून ही मुदत वर्षाची केली जाणार आहे. तसा वटहुकूम निघाल्यास अपात्र नगरसेवकांना दिलासा मिळू शकतो. त्या दृष्टीने पालकमंत्री तसेच दोन्ही आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यांनी वटहुकूम काढण्याचे आश्‍वासन दिल्याचे सांगितले. मंगळवारपर्यंत (ता. ४) वटहुकूम निघण्याची शक्‍यता आहे. ‘बॅक इफेक्‍ट’ने सदस्यांचे पद अबाधित राहू शकते.

Web Title: Preparing to take the government's decision about ineligible corporators