पंतप्रधानांच्या उपस्थितीत वीरशैवांचा "या' ठिकाणी महाकुंभ 

पंतप्रधानांच्या उपस्थितीत वीरशैवांचा "या' ठिकाणी महाकुंभ 

सोलापूर ः जगाला ज्ञानप्रकाश दिलेल्या काशी येथील "श्री जगद्‌गुरू विश्‍वाराध्य गुरुकुला'चा शतमानोत्सव आणि वीरशैवांचा वाराणसी येथे 15 जानेवारी ते 21 फेब्रुवारी या कालावधीत महाकुंभ आयोजिण्यात आला आहे. या महोत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती श्री काशी जगद्‌गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी आज शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. 

डॉ. महास्वामी म्हणाले,"" पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'श्रीसिद्धान्तशिखामणी' या ग्रंथाची गुजराती आवृत्ती व बेलपत्राचे रोप देऊन रुद्राक्षमाला अर्पण केली. त्यानंतर या कार्यक्रमाला येण्याचे निमंत्रण पंतप्रधानांनी स्विकारले. यावेळी केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, खासदार डॉ. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी उपस्थित होते.'' 

15 जानेवारीला होणार सुरुवात 
या शतमानोत्सवाचा प्रारंभ मकर संक्रातीच्या दिवशी म्हणजे 15 जानेवारीला होणार आहे. कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री के. एस. ईश्‍वरप्पा यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यावेळी उपस्थित राहणार आहेत. 19 जानेवारीला पुण्यश्‍लोक अप्पासाहेब वारद यांच्या 108 व्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रम होणार आहे. त्याचे उद्‌घाटन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करणार आहेत. त्यांच्याच हस्ते डॉ. शे. दे. पसारकर लिखित "श्री काशी विश्‍वाराध्य गुरुकुल' या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. 

हे पहा... कार्यक्रमाचे नियाेजना सांगताना डॅा. जयसिद्धेश्वर महास्वामी

31 जानेवारीला विशेष स्मरणोत्सव 
31 जानेवारी रोजी उद्योजक पद्मश्री डॉ. बाबासाहेब कल्याणी यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांचा विशेष स्मरणोत्सव साजरा केला जाणार आहे. यावेळी चित्रदुर्ग, हुब्बळी, निडसोसी आणि आनंदपूर येथील विरक्त जगद्‌गुरुंच्या उपस्थितीत हे कार्यक्रम होणार आहेत. 30 जानेवारी ते 5 फेब्रुवारीपर्यंत उदगीर येथील भक्तमंडळ शिवनाम सप्ताह करणार आहेत. 14 फेब्रुवारी रोजी काशीगुरुकुलातील काशी वीरशैव विद्वतसंघाचा हीरक महोत्सव आणि शिवाचार्य महासंमेलन होणार आहे. या कार्यक्रमामध्ये गुरुकुलाचे आजी-माजी विद्यार्थी आणि कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र व तेलंगणा येथील शिवाचार्य सहभागी होणार आहेत. या उत्सवात विविध वाद्यांचे शंभरपेक्षा जास्त कलावंत सहभागी होणार आहेत. 17 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत शतमानोत्सवाचे विविध कार्यक्रम होणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com