सध्याचे शासन वृत्तपत्र व साहित्यिकांचे स्वातंत्र्य हिरावून घेत आहे - सुशीलकुमार शिंदे

हुकूम मुलाणी
गुरुवार, 19 एप्रिल 2018

मंगळवेढा (सोलापूर) : सध्याचे शासन वृत्तपत्र व साहित्यिकांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे काम करत असताना देखिल वैचारिक भूमिका घेऊन नवीन दिशा देण्यासाठी लिखाण करणारे साहित्यिकच समाजाला जीवंत ठेवू शकतात असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.     

येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात मसापच्या मंगळवेढा शाखेकडून दुसऱ्या राज्यस्तरीय पुरस्काराचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांच्या हस्ते या पुरस्कार वितरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ.भारत भालके होते.

यावेळी मसापचे कार्याध्यक्ष मिलींद जोशी, रतनचंद शहा बॅकेचे अध्यक्ष राहूल शहा, चेतन नरोटे, प्रकाश पाटील, नगराध्यक्षा अरूणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, पद्माकर कुलकर्णी, शिवाजी काळुंगे, सुरेश कोळेकर, डाॅ. निलेश देशमुख, मसापचे अध्यक्ष सुरेश पवार, मसाप शाखा उपाध्यक्ष अजित शिंदे, कार्याध्यक्ष इंद्रजित घुले, कार्यवाह गणेश यादव आदी उपस्थित होते.

माजी मंत्री शिंदे म्हणाले की, क्रांतीकारकाचे काम साहित्यिकच करू शकतात महात्मा बसवेश्वर देखील क्रांतीकारकाचे साहित्यिक होते त्याच्या जयंतीनिमित्त साहित्यिकाचा गौरव ही अभिमानाची गोष्ट आहे .आ. भालके म्हणाले की, सोनंच सापडलेल्या या नगरीत सोन्यासारखी माणसं पुरस्काराच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या पटलावर आणण्याचे काम इथल्या साहित्यिकांनी केले. यावेळी नगराध्यक्षा अरुणा माळी, शिवाजी काळुंगे याची भाषणे झाली.  

या पुरस्कारामध्ये साहित्यिका उमा कुलकर्णी यांच्या संवादु-अनुवादु या आत्मकथनास स्व. इंदूमती वसंतराव शिर्के स्मृती साहित्य पुरस्कार, डॉ.एकनाथ पाटील यांच्या जागतिकीकरण वर्तमान आणि आव्हाने या संपादनास स्व.काशीबाई घुले स्मृती साहित्य पुरस्कार, हृषीकेश गुप्ते यांच्या दंशकाल या कादंबरीस शेपटाकार जगन्नाथ रत्नपारखी स्मृती साहित्य पुरस्कार तर योजना यादव यांच्या मरी मरी जाय सरीर या काव्यसंग्रहास रानकवी लक्ष्मण दुधाळ काव्य पुरस्कार रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, सन्मापत्र देवून गौरवण्यात आले.

नवलेखक सन्मानार्थ प्रथम माचणूरचे सिद्धेश्‍वर पवार यांच्या गावगुंड या कथासंग्रहास, जतचे नवनाथ गोरे यांच्या फेसाटी या कादंबरीस, सांगोल्याचे राजू सावंत यांच्या ग्रामीण चालीरीती या माहितीपर पुस्तकास, पंढपूरचे सुजितकुमार कांबळे यांच्या टोळकं या कथासंग्रहास तर निकीता पाटील यांच्या दिलखुलास या ललित लेखसंग्रहास हे पुरस्कार देण्यात आले.प्रास्ताविक कवि इंद्रजित घुले यांनी केले सुत्रसंचालन संतोष पवार यांनी तर आभार सुरेश पवार यांनी मानले.

Web Title: The present government is depriving the freedom of newspapers and literature said by sushilkumar shinde