दहशतवाद रोखण्यासाठी "सर्जिकल स्ट्राइक'च योग्य

परशुराम कोकणे : सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

26/11च्या घटनेतील जखमी आणि मृतांच्या नातेवाइकांचे म्हणणे

26/11च्या घटनेतील जखमी आणि मृतांच्या नातेवाइकांचे म्हणणे

सोलापूर  : मुंबईत झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्याला शनिवारी आठ वर्षे पूर्ण होत आहेत. 26/11च्या घटनेतील जखमी आणि मृतांच्या नातेवाइकांना आजही तो दिवस आठवला की थरकाप उडतो. टीव्हीवर दहशतवादी कारवायांच्या बातम्या पाहताना त्यांना प्रचंड राग येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या "सर्जिकल स्ट्राइक'च्या घटनेमुळे दहशतवादाला योग्य उत्तर दिल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले आहे. 
मुंबईवर 26/11ला झालेल्या हल्ल्यात सोलापूरचे माजी पोलिस आयुक्त अशोक कामटे शहीद झाले होते. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सोलापूरच्या अजीज रामपुरे आणि एजाज दलाल यांचा गोळ्या लागून मृत्यू झाला. शाबीर दलाल हे पायाला बंदुकीच्या गोळ्या लागून जखमी झाले. 26/11चा दिवस जवळ आला की रामपुरे आणि दलाल यांच्या घरांत आठ वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या होतात.

टीव्हीवर जेव्हा जेव्हा दहशतवादी कारवायांच्या बातम्या दिसतात तेव्हा दोन्ही कुटुंबांतील सदस्यांना दहशतवाद्यांचा प्रचंड राग येतो. महिला सदस्य तर शिव्या-शाप देतात. 26/11च्या घटनेला शनिवारी आठ वर्षे होत आहेत, यानिमित्ताने "सकाळ'ने जखमी शाबीर दलाल आणि मृत अजीज रामपुरे यांच्या पत्नी शमशाद रामपुरे यांच्याशी संवाद साधला. 

Web Title: To prevent terrorism "appropriate surgical straik