लाळ्या खुरकतची लागण झालेल्या जनावरांसाठी प्रतिबंधक लसीकरणाचे शिबीर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

मोहोळ - पापरी परीसरातील जनावरांना लाळ्या खुरकतची लागण या शिर्षकाखाली दै सकाळ मध्ये सविस्तर वृत प्रसिद्ध होताच पशुवैधकीय विभाग खडबडुन जागा झाला. यामुळे गुरुवार ता 24 रोजी सकाळी आठ वाजता लाळ्या खुरकत प्रतिबंधक लसीकरणाचे शिबीर आयोजित करण्यात आले. 

गेल्या आठवड्यापासुन पापरी परिसरातील जनावरांना लाळ्या खूऱकतची लागण झाली आहे. या रोगामुळे अनेक जनावर मृत्युच्या दारात उभी आहेत. त्याचा परिणाम दुध उत्पादनावर झाला असुन, त्यात मोठी घट झाली आहे. 

या बाबत दै सकाळने बुधवार ता 23 च्या अंकात सविस्तर वृत प्रसिद्ध केले होते. त्या व्रताची दखल पेनूर येथील पशुवैधकीय विभागाने घेऊन गुरुवारी शिबीराचे आयोजन केले होते. शिबीराचे उद्घाटन माजी सैनिक चंद्रकांत लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच अजीत भोसले समाधान लोंढे आप्पा चीन के ग्रामपंचायत सदस्य अंकुश माळी उपस्थीत होते.  डॉ. डी. एस. गायकवाड, डॉ. पी. एन. दरगुडे, डॉ. एस.  एन. सोनाळे, श्री. नरगिडे आदीनी लसीकरण केले. 

यांना दिली लस 
संकरीत गाई          145
देशी गाई               93 
म्हैस व रेडे            230 
शेळ्या                 341 

गावातील जनावरांना लसीकरण झाल्यानंतर वाडया वस्त्यावर लसीकरण करणार असल्याचे डॉ गायकवाड यांनी सांगीतले. 

Web Title: Prevention of immunization vaccine for animals