दुधाला दरवाढ मिळालीच पाहिजे - युवराज शिंदे

हुकूम मुलाणी
रविवार, 29 एप्रिल 2018

शासनाने दुधाला दर वाढ केली नाही, तर शेतकऱ्यांचे जनावर संभाळण्याचे काम कठीण होईल. दुधाला 27 रुपये दर मिळाला नाही तर युवक काँग्रेसच्या वतीने यापुढेही तीव्र आंदोलन करण्यात येईल. दुध दरवाढीच्या आंदोलनाला प्रहार संघटनेने पाठिंबा दिला आहे.

मंगळवेढा - सांगोला रोडवरील डॅाक जवळ युवक काँग्रेसच्या वतीने दूध दरवाढीसाठी रास्ता रोको करण्यात आले. या आंदोलनामुळे सोलापूर, सांगली, कोल्हापूरसह कोकणात जाणाऱ्या वाहनांची कोंडी झाली. आंदोलनातील मागण्यांचे निवेदन पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांना आ. भारत भालके यांच्या हस्ते यावेळी देण्यात आले.

युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष युवराज शिंदे यावेळी बोलताना म्हणाले की, शेतकऱ्यांच्या दुधाला दर वाढ मिळाली पाहिजे, चाऱ्याचे दर पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत. दुधाच्या कमी दरामुळे जनावराचे पालन पोषण परवडत नसल्यामुळे जनावरे कत्तलखान्याकडे जात आहेत. शासनाने दुधाला दर वाढ केली नाही, तर शेतकऱ्यांचे जनावर संभाळण्याचे काम कठीण होईल. दुधाला 27 रुपये दर मिळाला नाही तर युवक काँग्रेसच्या वतीने यापुढेही तीव्र आंदोलन करण्यात येईल. दुध दरवाढीच्या आंदोलनाला प्रहार संघटनेने पाठिंबा दिला आहे.

आ. भारत नाना भालके, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, भारत नागणे, संकेत खटके, राहुल सावंजी, निकिता पाटील, दत्ता यादव, भुजंगराव पाटील, संदीप फडतरे, रविकिरण कोळेकर, जाकीर सुतार, मारुती पवार, अमर पाखरे, चैतन्य गांडूळे बंडोपंत लेंडवे, मधुकर मोरे, विलास उबाळे, विशाल पाटील धनंजय सरवदे, विनोद चौगुले मारूती थोरात, सागर डवले, अतिश पाटील, निलेश पाडावे, लखन मुळे, समाधान मुळे, संकेत पवार, नारायण हेंबाडे, संतोष मोरे राहुल कांबळे, रणजीत वाडदेकर, गणेश शिंदे, शकील खाटीक, सुधीर हजारे, गणेश मुळे, नवनाथ हुंडाबळी, राजेंद्र सावंत, नवनाथ मासाळ, रजत मकानदार, तेजस डोके त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकरी व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The price of milk should be given rs 27