करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील पुजारी प्रक्रिया कायदेशीरच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

कोल्हापूर - श्री अंबाबाई मंदिरातील पुजारी प्रक्रिया कायदेशीर आहे. पगारी पुजारी नेमण्याबाबत देवस्थान समितीच्या विरोधी श्रीपूजक गजानन मुनीश्‍वर व अजिंक्‍य मुनीश्‍वर यांनी दिवाणी न्यायालयात केलेली मागणी फेटाळली आहे. मात्र, कायद्याची अंमलबजावणीच्या नियत दिनांकापर्यंत सध्याच्या श्रीपूजकांना पूजेचा अधिकार असून, त्यात देवस्थान समितीने कोणताही अडथळा आणलेला नाही, असे पत्रक देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

पत्रकात म्हटले आहे, ‘‘शासनाने १२ एप्रिल २०१८ रोजी कायदा संमत केला असून, त्यात नमूद केलेल्या नियत दिनांकापासून कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर शासनाने विधी व न्याय विभागाकडून बैठका सुरू असून, त्याबाबतचा अहवाल शासनाला दिला आहे. पगारी पुजारी नेमण्याबाबत ३ फेब्रुवारी २०१९ ला जाहिरात प्रसिद्ध केली असून, त्यानुसार प्रक्रिया सुरू आहे. मात्र, प्रक्रियेनुसार पुजारी नेमता येणार नाहीत, म्हणून दिवाणी न्यायालयात श्रीपूजक मुनीश्‍वर यांनी दावा दाखल केला होता. त्यात पुजारी नेमू नयेत म्हणून तूर्तातूर्त मनाईची मागणीही केली होती; मात्र न्यायालयाने प्रक्रिया योग्य व कायदेशीर असल्याचा निष्कर्ष नोंदवला असून, त्याबाबत कोणतीही मनाई दिलेली नाही. यापूर्वी तात्पुरत्या पुजारी भरती प्रक्रियेबाबत उच्च न्यायालयातही श्रीपूजकांनी दावा दाखल केला होता. मात्र, तो लगेचच त्यांनी काढून घेतला आहे. सुरेश पोवार यांनीही केलेला दावा दिवाणी न्यायालयाने १४ फेब्रुवारी २०१९ रोजी फेटाळला आहे. उच्च न्यायालयात समितीच्या वतीने ॲड. संजीव सावंत आणि दिवाणी न्यायालयात अमित बाडकर यांनी काम पाहिले.’’

Web Title: The priest process of Karveer Nivasini Ambabai temple is legal