कोंगनोळीतील प्राथमिक शाळा होणार मॉडेल स्कूल; शासकीय निधी व लोकवर्गणीतून शाळांचा होणार कायापालट

The primary school in Kongnoli will be a model school
The primary school in Kongnoli will be a model school

सलगरे ः कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली ) येथील जिल्हा परिषद शाळा एक व दोन या दोन्ही शाळांची जिल्हा परिषदेतर्फे मॉडेल स्कूल म्हणून निवड करण्यात आली आहे. मॉडेल स्कूल, या योजनेतून शाळांना शासकीय निधी उपलब्ध करून देऊन उर्वरित रक्कम लोकवर्गणीतून गोळा करून दोन्ही शाळांतील प्रलंबित असणारी विकासकामे व नवीन कामे करून मॉडेल स्कूल योजनेच्या माध्यमातून अंतर्बाह्य विकास होईल, अशी माहिती शाळाचे मुख्याध्यापक यासराव शेळके, मुख्याध्यापिका पुष्पा मोरे यांनी दिली.

मुख्याध्यापक शेळके म्हणाले,""या योजनेच्या माध्यमातून शासकीय निधी व जमा होणाऱ्या लोकवर्गणीतून एकत्रितपणे क्रीडांगण, शौचालय दुरुस्ती, 60 बाय 30 फुटांचे बहुउद्देशीय सभागृह, वर्गखोल्या, शाळेच्या चारही बाजूंनी कंपाऊंड करणे ही कामे या योजनेतून अपेक्षित आहेत. शाळेच्या बौद्धिक, शारीरिक व सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने तसेच विविध शालेय गुणवत्ता व क्रीडा क्षेत्राकडे लक्ष देऊन अधिकाधिक विद्यार्थीप्रगतीसाठी शाळेचे प्रयत्न होतील.

यापुढील काळांमध्ये कोंगनोळीतील शाळांचा एक "मॉडेल' म्हणून विकास करण्यासाठी धडपड सुरू आहे. शाळांतील विकासकामे व दर्जा याबाबत शाळा व्यवस्थापन समिती, गावचे पदाधिकारी शिक्षण विभागाचे अधिकारी यांची मदत घेऊन मॉडेल स्कूल योजना यशस्वी करण्याचा शाळेतील सर्व शिक्षक व गावांतील मान्यवरांचा मानस असल्याचे मुख्याध्यापक शेळके यांनी सांगितले.

या योजनेसाठी गटशिक्षणाधिकारी आर. जी. पाटील, विस्तार अधिकारी अन्सर शेख व विश्वास साबळे, केंद्रप्रमुख भास्करराव गंभीरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही शाळेतील मुख्याध्यापक यासराव शेळके व मुख्याध्यापिका पुष्पा मोरे तसेच आनंदा आटपाडकर, श्रीकृष्ण लोंढे, अन्वर मुजावर, स्मिता पवार, नंदा शिनगारे, सुलक्षणा आलदर, दीपा हंगरगे, शारदा पाटील, संजीवनी बहादुरे, चंद्रकांत जाधव हे शिक्षक सहकारी धडपड करीत आहेत. 

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com