प्राथमिक शिक्षक संपात बिनपगारी?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

सातारा - सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील शिक्षकही सहभागी झाले होते. त्यांनी तीन दिवस संप पुकारून शाळा बंद ठेवल्या होत्या. आता मात्र, त्याबाबतची माहिती शिक्षण विभाग घेत असून, संबंधित संपकरी शिक्षकांनी बिनपगारी रजा करून वेतनाला कात्री लागण्याची शक्‍यता आहे. 

सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, अंशदायी पेन्शन योजना बंद करून १९८२ ची परिभाषित पेन्शन योजना सर्वांना लागू करावी, सर्व संवर्गातील रिक्त पदे तत्काळ भरावीत, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्‍त्या तत्काळ कराव्यात, शिक्षण क्षेत्रातील विना अनुदानित धोरण रद्द करावे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजनेचे लाभ अनुज्ञेय करावीत, शिक्षकांसाठी कॅशलेस मेडिकल योजना लागू करावी, यासह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी प्राथमिक शाळा बंद राहिल्या. परिणामी, सलग तीन दिवस शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षण विभागाच्या आदेशानुसार संप काळात सहभागी शिक्षकांची माहिती मागविली जात आहेत.

शासन निर्णयाची संपकऱ्यांना आशा
शासन निर्णयानुसार कामावर नसल्यास पगार कपात करण्यात येतो. मात्र, संप काळात तोडगा काढण्यासाठी झालेल्या बैठकांत संप काळातील सहभागी कर्मचाऱ्यांचे पगार कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संपकरींचे म्हणणे आहे. मात्र, त्याबाबत प्रशासनाला अद्याप आदेश आले नाहीत, तरीही शासन तसे आदेश काढेल, अशी आशा शिक्षकांना आहे. 

Web Title: Primary teacher strike