पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा पेमगिरीमध्ये फलक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

आश्‍वी (जि. नगर) - संगमनेर तालुक्‍यातील पेमगिरीच्या गावकऱ्यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन करणारा भव्य फलक लावला आहे. चलनातून पाचशे व एक हजारच्या नोटा बाद करण्याच्या निर्णयाबद्दल गावकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे!

प्रचंड वटवृक्षामुळे पेमगिरी प्रसिद्ध आहे. तेथील सर्वसामान्य माणसांनी गावातील मोठ्या व वर्दळीच्या चौकात फलक लावून पंतप्रधानांचे अभिनंदन केले आहे. मोदी यांचे छायाचित्र असलेल्या या फलकावर लिहिले आहे, "भ्रष्टाचामुक्तीसाठी 500 व 1000 रुपयांच्या चलनी नोटा बंद केल्यामुळे मा. पंतप्रधान मोदीजींचे हार्दिक आभार!' फलकाच्या खाली "समस्त कष्टकरी शेतकरी, गोरगरीब ग्रामस्थ, पेमगिरी' असा उल्लेख आहे.

या नोटा चलनातून बाद केल्यानंतर अनेक चांगल्या-वाईट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. बॅंकांच्या दारातील रांगा, "एटीएम'मधील खडखडाट, बाजारपेठेत मंदी, असे चित्र दिसत आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणूस व शेतकरी काहीसा अस्वस्थ होता. हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने, याच्या इतर पैलूंची व आगामी परिणामांची चर्चाही होत आहे. या निर्णयामुळे भ्रष्टाचार नष्ट होईल, अशीच आशा ग्रामीण जनतेला असल्याचे फलकावरून दिसते.

Web Title: Prime Minister congratulated board in Pemgiri