पंतप्रधान मोदींनी साधला वेबकास्टिंगद्वारे महिलांशी संवाद

Prime Minister Modi interaction with women through webcasting
Prime Minister Modi interaction with women through webcasting

मोहोळ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेबकास्टिंगद्वारे महिला बचत गट सदस्यांशी सुसंवाद साधला. याचे प्रक्षेपण कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ येथे करण्यात आले होते. तसेच याप्रसंगी कृषि पुरक उद्योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख कार्यक्रम समन्वयक डॉ. दिनेश नांद्रे हे होते तसेच कार्यक्रमप्रसंगी किरण माने, राज्य कार्यक्रम अधिकारी, स्वयं शिक्षण प्रयोग, पुणे व राजरत्ना जावळे, तालुका समन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ, मोहोळ हे उपस्थित होते. कार्यक्रमास महिला आर्थिक विकास महामंडळ आणि स्वयं शिक्षण प्रयोग, पुणे यांचे अंतर्गत असलेल्या बचत गटातील महिलांनी बहुसंख्येने सहभाग घेतला. 

सदर प्रसारणादरम्यान पंतप्रधानांनी  देशभरातील विविध राज्यांतील महिला बचत गटातील महिलांशी थेट सुसंवाद साधून महिला बचत गटांनी केलेल्या उल्लेखनीय कार्य, व्यवसाय व उत्पादने यांचा आढावा घेतला. महिला बचत गटांनी त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी जेम (GEM) पोर्टल वर नोंदणी करावी असे नमूद केले. कृषि पुरक उद्योग आणि शेतमाल मूल्यवर्धनावर अधिकाधिक भर देण्याचे अावाहन त्यांनी यावेळी केले  

कार्यक्रमास उपस्थित महिलांनी आपापल्या बचत गटाची कार्याची माहिती देऊन मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी आयोजित कृषि पुरक उद्योग कार्यशाळेदरम्यान मोहोळ येथील कृषि विज्ञान केंद्राचे डॉ. नांद्रे यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने विविध कृषि पूरक उद्योगांचे महत्त्व विषद केले.

तसेच महिला बचत गटांना विविध उद्योग उभारणीसाठी लागणारे कौशल्य आधारित प्रशिक्षणे देण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र सदैव तत्पर राहील अशी ग्वाही दिली.

तांत्रिक सत्रादरम्यान दिनेश क्षीरसागर, विषय विशेषज्ञ (अन्नशास्त्र व तंत्रज्ञान) यांनी महिला बचत गटांसाठी अन्न प्रक्रिया उद्योगातील संधी, पॅकेजिंग व गुणवत्ता नियंत्रण, डॉ. तानाजी वळकुंडे, विषय विशेषज्ञ (पशुविज्ञान व दुग्धशास्त्र) यांनी शेळीपालन, परसातील कुक्कुटपालन आणि मुरघास निर्मिती तंत्रज्ञान या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

काजल जाधव, विषय विशेषज्ञ (मृदविज्ञान व कृषि सायनशास्त्र) यांनी सेंद्रिय खत निर्मितीबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय दिघे, विषय विशेषज्ञ (कृषि विस्तार) यांनी तर आभार दिनेश क्षीरसागर, विषय विशेषज्ञ (अन्नशास्त्र व तंत्रज्ञान) यांनी मानले  कार्यक्रम यशस्वीतेसाठी काका अडसुळे, रेश्मा राऊत, योगेश बोडके, महेश ढवळे सुयोग ठाकरे,  तुषार आहिरे,. नरेंद्र जाधव,  संजय बनसोडे,  ज्ञानेश्वर तांदळे, अरुण गांगोडे यांनी परिश्रम घेतले .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com