"प्रधानमंत्री श्रमयोगी' वृद्धापकाळासाठी काठी! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धापकाळात दिलासा देण्याच्या हेतूने सरकारने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना कार्यान्वित केली. योजनेत असंघटित क्षेत्रातील कामगारांबरोबरच लघू व्यापाऱ्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

नगर : ः ""असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धापकाळात दिलासा देण्याच्या हेतूने सरकारने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना कार्यान्वित केली. योजनेत असंघटित क्षेत्रातील कामगारांबरोबरच लघू व्यापाऱ्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे उतार वयामध्ये योजनेतून मिळणारे मानधन आधाराची काठी ठरणार आहे. व्यापारी, असंघटित कामगार संघटनेचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.

 हेही वाचा शिक्षणाची रामपूरवाडी एक्‍स्प्रेस(व्हिडिओ) 

जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात राष्ट्रीय पेन्शन योजना सप्ताहाचे आज उद्‌घाटन करण्यात आले. भविष्य निर्वाह निधीचे सहायक आयुक्त अभिषेक मिश्रा, सहायक कामगार आयुक्त नितीन पाटणकर, हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा, आदी या वेळी उपस्थित होते. योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, योजनेसाठी नोंदणी व्हावी, या हेतूने आज देशपातळीवर राष्ट्रीय पेन्शन योजना सप्ताह सुरू करण्यात आला. 

दोन हजार 240 सेवा केंद्रावर रजिस्ट्रेशन 
पाटणकर म्हणाले, ""सप्ताहाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत पेन्शन योजनेची माहिती पोहचविली जाणार आहे. सोमवारी (ता. 30) शुक्रवारी (ता. 6) या कालावधीत सप्ताह पार पडणार आहे. जिल्ह्यात दोन हजार 240 सेवा केंद्रावरच लाभार्थ्यांचे रजिस्ट्रेशन केले जाणार आहे.'' 
 

हेही वाचा थरार... द बर्निंग ट्रक 

26 हजारांची योजना 
योजनेसाठी असंघटित कामगारांसाठी 56 हजार 800, लघू व्यापाऱ्यांसाठी 20 हजार 400 चे उद्दिष्ट देण्यात आले. आजअखेर 25 हजार 764 जणांची नोंदणी झाली, अशी माहिती सेवा केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक मच्छिंद्र चितळे यांनी दिली. 
 

योजनेच्या अटी 
- वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष 
- मासिक उत्पन्न पंधरा हजारापेक्षा पेक्षा कमी 
- सभासद आयकर दाता नसावा 

आवश्‍यक कागदपत्रे 
आधार कार्ड, बॅंक पासबुक, मोबाईल नंबर, वयानुसार पहिले मासिक अंशदान. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister's Labor scheme