विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

सांगली - आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ हायस्कूलच्या मुुख्याध्यापकाने विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आटपाडी पोलिसांनी रंगराव बाबुराव जाधव या मुख्याध्यापकाला आज सकाळी अटक केली आहे.

हा मुख्याध्यापक मागील सात ते आठ महिन्यापासून विद्यार्थ्यांनिंना शिकवण्याचा बहाणा करून त्यांचा विनयभंग करत होता. लज्जा उत्पन्न होईल असे अनेक प्रकार मुख्याध्यापकांनी केल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलींनी हा प्रकार पालकांना सांगितल्यानंतर काही पालकांनी शाळा व्यवस्थापन समितीकडे तक्रार केली होती.  या तक्रारीनुसार निर्भया पथकाने गोपनीयरीत्या या प्रकरणाचा तपास केला.

शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनीना भेटून प्राध्यापकांच्या या कृत्याची खात्री केली आणि मुख्याध्यापकाचा या कृत्याचा पर्दाफाश केला.  मुख्याध्यापक जाधव यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या मुख्याध्यापका विरोधात चार विद्यार्थ्यांनीनी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Principal arrested in Obscene case