कोल्हापूरात सीपीआरमध्ये कैद्याचा मृत्यू 

राजेश मोरे
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - पाचगाव (ता. करवीर) येथे राजकीय वर्चस्वातून झालेल्या धनाजी गाडगीळ खूनप्रकरणी कारावासाची शिक्षा भोगणाऱ्या अक्षय जयसिंग कोंडेकर (वय 33) या कैद्याचा आज सकाळी सीपीआरमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

कोल्हापूर - पाचगाव (ता. करवीर) येथे राजकीय वर्चस्वातून झालेल्या धनाजी गाडगीळ खूनप्रकरणी कारावासाची शिक्षा भोगणाऱ्या अक्षय जयसिंग कोंडेकर (वय 33) या कैद्याचा आज सकाळी सीपीआरमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

उपचारात कारागृह प्रशासनाने दिरंगाई केली तर सीपीआरमधील डॉक्‍टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप नातेवाईक व मित्रपरिवाराने केला आहे. त्यातून एका डॉक्‍टरला मारहाण करण्याचा प्रयत्नही झाला. यामुळे सीपीआरमध्ये गोंधळाचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. तरीही हजारोच्या संख्येने समर्थक सीपीआर बाहेर थांबून होते. दरम्यान कळंबा कारागृहातील आणखी एका कैद्याचा मृत्यू झाल्याने तणावात भर पडली. 

न्यू महाद्वाररोडवर फेब्रुवारी 2013 ला अशोक मारुती पाटील यांचा गोळ्या झाडून खून केला होता. खुनाचा बदला अशोक पाटील समर्थकांनी घेतला. त्यांनी डी. जे. चा मेहुणा धनाजी गाडगीळ याचा डिसेंबर 2013 मध्ये खून केला. अशोक पाटील खून प्रकरणी डी.जे. ग्रुपमधील अक्षय जयसिंग कोंडेकर (वय 30, रा. पाचगाव) याच्यासह 11 जणांना न्यायालयाने दोषी ठरवून त्या सर्वांना 23 एप्रिल 2018 ला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. सध्या अक्षय कोंडेकर हा कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याचा उपचारा दरम्यान आज सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे हा तणाव निर्माण झाला. याबाबत कारागृह प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे अक्षच्या नातेवाईकांनी सांगितले. 

Web Title: Prisoner death in Kolhapur CPR