निधी कसा वापरला त्याचा आढावा घेणार: पृथ्वीराज चव्हाण 

सचिन शिंदे
शनिवार, 12 मे 2018

कऱ्हाडला ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळ, प्रितीसंगम बाग, स्विमीग टॅंक, बहुउद्देशीय हॉल यासह रस्त्यांना कित्येक कोटींची निधी दिली आहे. तो निधी कसा वापरला. त्याची सध्याची काय स्थिती आहे. त्यात भष्ट्राचा र झाला आहे का, काम संथ कगीतने सुरू आहे का, यासगळ्याची चौकशी करण्यासाठी पालिकेची आढावा बैठक लवकरच घेत आहोत. त्या बैठकती काम का झाली नाहीत. ती कसात अडकली आहे.

कऱ्हाड ः ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्म शताब्दी निमित्तासह त्यानंतरही मोठ्या प्रमाणात कऱ्हाड शहरासाठी निधी दिला आहे. तो कसा वापरला. त्याची सध्याची काय स्थिती आहे, याची लवकरच आढावा बैठक घेणार आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. पालिकेत सत्ता येईपर्यंत माझ्यासोबत राहिलेली लोक आता विरोधात गेली आहेत. आम्हाला लोकच चांगली सापडली नाहीत, अशी खंतही चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले.

चव्हाण म्हणाले, कऱ्हाडला ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळ, प्रितीसंगम बाग, स्विमीग टॅंक, बहुउद्देशीय हॉल यासह रस्त्यांना कित्येक कोटींची निधी दिली आहे. तो निधी कसा वापरला. त्याची सध्याची काय स्थिती आहे. त्यात भष्ट्राचा र झाला आहे का, काम संथ कगीतने सुरू आहे का, यासगळ्याची चौकशी करण्यासाठी पालिकेची आढावा बैठक लवकरच घेत आहोत. त्या बैठकती काम का झाली नाहीत. ती कसात अडकली आहे. पूर्ण झालेल्या कामांची काय स्थिती आहे. यासगळ्याची सखोल चौकशी करणार आहे. सत्तेत येईपर्यंत जे लोक माझ्यासोबत राहिले. ते सत्ता आळ्यानंतर आमच्यापासून दूर गेले. त्य़ाला आम्ही काही करू शकत नाही. त्यांच्यावर आंधळेपमाने विश्वास ठेवला असे फारतर म्हणता येईल. मात्र जो निधी दिला आहे. त्या निधीच काय केले यासाठी पालिकेची त्याच लोकांसमवेत आढावा बैठक घेणार आहे. आम्ही मंजूर कामाची उद्दघाटन खुशाल करा पण लोकाभमिुख काम असण अत्य़ंत गरजेचे आहे. लोकांच्या विकासाठी आम्ही निधी दिला होता. त्याचा कितपत व कसा वापर झाला आहे ते पहावे लागलेच. त्यामुळे पालिकेतील अधिकाऱ्यांसह सध्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ठेवण्यात येणार आहे. 

चव्हाण म्हणाले, कऱ्हाड दक्षिणेतील अनेक गांवाचा पाणी प्रश्न दक्षिणेतील पाण्यावर संपणार असेल व तसा एखधा नविन प्रश्ताव कोणाही मार्फत येत असेल तर त्याचे स्वागतच आहे. त्याबाबत शासनानेही तितक्याच पॉझीटिव्हली त्याकडे पाहण्याची गरज आहे. वाकुर्डी पाणी योजनेचे बील अदा करण्याची गरज आहे. त्याची काय स्थिती आहे. याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेवून त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. वाकुर्डेचे पाणी बंदीस्त पाईपने येथपर्यंत आणण्याची जी काही योजना आखली गेली आङे. तीही चांगली आहे. मात्र प्रत्यक्षात ती कितीपत परवडणारी आहे, याचाही अभ्यास होण्याची गरज आहे. 

Web Title: Prithviraj Chavan talked about development work