आमदार फंडातील कामांत पृथ्वीराजबाबांची आघाडी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

सातारा - जिल्ह्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून डिसेंबरअखेर आठ कोटी ८८ लाख रुपयांची १६२ विकासकामे मार्गी लागली आहेत. निधी खर्चात शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब पाटील यांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे.

आमदारांना स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत वर्षाला दोन कोटींचा निधी मिळतो. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे पाच, काँग्रेसचे दोन, शिवसेनेचा एक आणि विधान परिषदेचे दोन अशा एकूण दहा आमदारांचा समावेश आहे. प्रत्येक आमदाराला वर्षाला अडीच कोटींचा निधी मिळतो.

यामध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निधीतून सहा कामांवर ५३.२१ लाख, शशिकांत शिंदे यांच्या निधीतून १४ कामांसाठी एक कोटी १५ लाख,२५ हजार, मकरंद पाटील यांच्या निधीतून एका कामांवर १५ लाख, दीपक चव्हाण यांच्या निधीतून २१ कामांवर एक कोटी दहा लाख ६४ हजार, जयकुमार गोरे यांच्या निधीतून २६ कामांवर ७७ लाख ३५ हजार, पृथ्वीराज चव्हाण यांनी २८ कामांवर एक कोटी ५२ लाख १४ हजार, बाळासाहेब पाटील यांनी २१ कामांवर एक कोटी १५ लाख ८६ हजार रुपये, शंभूराज देसाई यांच्या फंडातून तीन कामांवर २३ लाख रुपये खर्च झाले आहेत, तर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फंडातून २५ कामांवर एक कोटी ५२ लाख ७५ हजार रुपये आणि आनंदराव पाटील यांच्या फंडातून १७ कामांवर ७१ लाख ९१ हजार रुपये खर्च केले आहेत. आमदार फंडातून डिसेंबरअखेर झालेला हा खर्च आहे.

एकूण दहा आमदारांच्या फंडातून १६२ कामांवर आठ कोटी ८८ लाख ११ हजार रुपये खर्च झाले आहेत. 

निधी खर्चात शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील आणि सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांची आघाडी आहे, तर आमदार फंडातून सर्वाधिक २८ कामे करून पृथ्वीराज चव्हाण यांनी आघाडी घेतली आहे. त्यांच्या पाठोपाठ जयकुमार गोरे, रामराजे नाईक- निंबाळकर यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात १६२ विकासकामे मार्गी 
विधानसभेच्या आठ आमदारांच्या फंडातून डिसेंबरअखेर ६६२.४५ कोटींची १२० कामे मार्गी लागली आहेत. तर विधान परिषदेच्या दोन आमदारांच्या फंडातून २२५.६६ कोटींची ४२ कामे मार्गी लागली आहेत.

Web Title: Prithviraj Chavan Topper in MLA Fund Work