वावड्या नको...शतप्रतिशत शिवसेनेतच 

वावड्या नको...शतप्रतिशत शिवसेनेतच 

सांगली - सध्या वावड्या उठत आहेत. परंतु कोणतीही शंका बाळगू नका. शतप्रतिशत शिवसेनेचे काम आम्ही करणार आहोत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी विरोधात आम्ही जरूर लढू. परंतु आमचा नंबर एकचा प्रतिस्पर्धी भाजपा असेल, असा इशारा शिवसेना नेते पृथ्वीराज पवार यांनी येथे दिला. 

गावभागातील पवार तालीमसमोर शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक झाली. स्वाभिमानी विकास आघाडीचे सतीश साखळकर, नगरसेवक गौतम पवार, शिवराज बोळाज, विशाल पवार, रावसाहेब खोचगे, अजिंक्‍य पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

श्री. पवार म्हणाले, ""भाजपाने यंदाची निवडणूक विचारधारेवर नव्हे तर पैशावर लढवली. शिवसेना मात्र लाचार झाली नाही. मूळ विचार, पिंड सोडला नाही. सध्या वावड्यांचे वातावरण आहे. माजी आमदार संभाजी पवार अन्य पक्षात जाणार अशी चर्चा सुरू आहे. परंतु आम्ही शतप्रतिशत शिवसेनेचे काम करणार आहे. आजची ही बैठक वावड्यांना उत्तर असेल. आमच्या रक्तात गद्दारी, विश्‍वासघात नाही. पाठीत कधीही वार केला नाही. प्रामाणिकपणे सामाजिक काम केले. ग्रामीण, शहरी भागात शिवसेनेच्या शाखांची बांधणी करू. कॉंग्रेस-राष्ट्रवादीबरोबर भाजपावर हल्ला करायची वेळ आली तर जरुर केला जाईल. आमच्याकडे सर्वांच्या कुंडल्या तयार आहेत. थेट हल्ला चढवला जाईल.'' 

गौतम पवार म्हणाले, ""कितीही वादळे आली तरी शिवसेनेने विचार सोडला नाही. मुंबईत ज्याप्रमाणे यश मिळवले त्याप्रमाणे सांगलीतही यश मिळवू. शिवसेनेची मतदारसंख्या वाढली. कॉंग्रेसला आतापर्यंत टक्कर दिली. तेव्हा फेसबुक, व्हॉटस्‌ ऍपवरून आलेला भाजपा आमच्यापुढे किती काळ टिकणार? मुंबईप्रमाणे सांगलीतही सत्ता द्या. 40 नगरसेवक आम्हाला द्या. पुढची 60 वर्षे आम्ही सत्ता ठेवून विकास करू.'' 

श्री. साखळकर म्हणाले, ""महापालिका क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. स्थानिक प्रश्‍न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. संघटीतपणे काम केले तर प्रश्‍न सुटतील. आम्हाला कामच करायचे आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन ताकद दाखवावी.'' 

नगरसेवक बोळाज, श्री. खोचगे, अजिंक्‍य पाटील, नीलेश हिंगमिरे यांनी मनोगत व्यक्त केले. विशाल पवार यांनी प्रास्ताविक केले. नगरसेवक बाळू गोंधळे, रवी देवळेकर, महेंद्र चंडाळे, हेमंत खंडागळे, कविता बोंद्रे, रेखा पाटील आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. अशोक गोसावी यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com