बिसूरमधील वृद्ध दांपत्यास खासगी सावकाराची मारहाण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 डिसेंबर 2018

सांगली - दहा टक्के व्याजाने दिलेले व्याजदराचे पैसे मुदतीत परत करूनही जादा पैशांसाठी बिसूर (ता. मिरज) येथील वृद्ध दाम्पत्यास मारहाण केल्याप्रकरणी येथील खासगी सावकारावर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. युनूस नजीर पखाली (रा. गारपीर चौक) असे त्या खासगी सावकाराचे नाव आहे. शिवाजी आनंदराव पाटील (वय ७०, रा. बिसूर) यांनी फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी शिवाजी पाटील हे बिसूरमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहतात. ते आणि त्यांचा मुलगा मंगेश दोघे शेती करतात. श्री.  पाटील यांना मध्यंतरी हृदयविकाराचा त्रास झाला. त्यानंतर सांगलीतील एका डॉक्‍टरांकडे त्यांनी उपचार घेतले. औषधोपचारासाठी पैसे कमी पडत होते. त्यासाठी त्यांनी बिसूरमधील ताजुद्दीन मुजावर याचा भाचा इनुस पखाली याच्याकडून नोव्हेंबर २०१७ मध्ये दहा टक्के व्याजदराने ७० हजार रुपये घेतले. दर महिना सात हजार व  व्याजाची रक्कम असे ते परत करत होते. पैसे देण्यास विलंब झाल्यास प्रतिदिन एक हजाराचा दंडही दिला होता. 

दरम्यान, तेरा महिन्यांत लाखाची रक्कम त्याने वसूल केली. त्यानंतरही त्याने ७० हजार रुपये बाकी असल्याचे सांगितले. त्यासाठी तो वारंवार पैशांसाठी तगादा लावत होता. गुरुवारी (ता. २९) सायंकाळी साडेसातच्या सुमारास पखाली श्री. पाटील यांच्या घरी गेला. पैशांसाठी त्याने तगादा लावला. तसेच शिवाजी पाटील आणि  त्यांच्या पत्नीस शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर पाटील यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार युनूस पखाली याच्या महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तो पसार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: private lender hit elderly couple in Beasoor