खासगी दूध संस्थांकडून पशुपालकाचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न

हुकूम मुलाणी
सोमवार, 16 जुलै 2018

मंगळवेढा - राज्यात दूध दरावरून आंदोलन सुरू असताना पशुपालकासमोर काढलेल्या दुधाचे काय करायचे हा प्रश्न समोर उभा आहे. खासगी दूध संस्थांनी पाच रूपये लीटर दराने दूध खरेदी करून पशुपालकाचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दरावरून आंदोलन करण्याचा इशारा यापुर्वीच होता. तालुक्यातील सहकारी संस्था, दूध संकलन केंद्र, गवळी यांच्या माध्यमातून जवळपास दोन लाखापेक्षा अधिक दुधाचे संकलन केले जाते. पण काल संध्याकाळी हॅटसन दूध संकलन केंद्राने दूध घेणार नसल्याचे सांगितल्यानंतर पशुपालकानी खासगी दूध संकलन केंद्रात दुध घेण्याची विनंती केल्यावर पाच रू दराने खरेदी केले. तर काही ठिकाणी मोफत वाटण्यात आले. दुधविक्रीत येणाऱ्या पैशापेक्षा पशुखाद्याच्या खरेदीची किंमत जास्त होत आहे. याची झळ दक्षिण व पश्चिम भागाला मोठ्या प्रमाणात बसत आहे.

Web Title: private milk sanstha rate of milk